Menu Close

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

  • देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! 
  • छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांना पाठीशी घालून हिंदूंवरच कारवाई होणार, यात आश्‍चर्य ते काय ? -संपादक 

गरियाबंद (छत्तीसगड) – येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे. यासह ‘ज्या लोकांनी धर्मांतर केले आहे, अशा व्यक्तींच्या हातात नारळ दिला जाईल आणि त्याला पुन्हा हिंदु धर्मात घेतले जाईल’, अशी घोषणाही त्यांनी केली. गावकर्‍यांच्या विरोधानंतर उपजिल्हाधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी गावकर्‍यांना शांत केले.

या गावामध्ये प्रत्येक रविवारी ख्रिस्त्यांकडून एका गावकर्‍याच्या घरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येते. तेथेच जाऊन गावकर्‍यांनी विरोध चालू केला. गावकर्‍यांचा आरोप आहे की, प्रार्थनेसाठी गावाबाहेरून काही लोक येतात. ते आम्हाला ख्रिस्ती होण्यासाठी विविध आमिषे दाखवतात. त्याचा परिणाम असा झाला आहे की, एकाच कुटुंबातील काही मुले हिंदु, तर काही ख्रिस्ती, असे गट झाले आहेत. केवळ आमच्याच नाही, तर अन्य गावांमध्येही धर्मांतर केले जात आहे.

जशपूरमधील गावातही धर्मांतराचा प्रयत्न ; पोलिसांकडून हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनाच अटक

जशपूरमधील साजबहार गावामध्येही धर्मांतराची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. येथील सरपंच सोनम लकडा यांच्या घरातही सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्यात येणार होते. या सभेची माहिती मिळताच हिंदु नेते विजय सिंह जूदेव सरपंच सोनम लकडा यांच्या घरी पोचले आणि सभेला विरोध केला. येथे सभेसाठी ४ हिंदु उपस्थित होते. हिंदु संघटनेने सरपंच सोनम लकडा यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्रार्थना सभेला विरोध केल्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि ‘येथे धर्मांतराचा प्रयत्न झालेला नाही’, असे सांगितले. (काँग्रेस सरकारचे बटिक बनलेले छत्तीसगड पोलीस ! – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *