Menu Close

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

कोल्लम् (केरळ) – येथे एका मुसलमानाने इस्लाम धर्माचा त्याग केल्याने त्याला धर्मांधांच्या जमावाने मारहाण केली. अस्कर अली असे या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणाच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

केरळच्या मलप्पूरम् जिल्ह्यात रहाणारे अस्कर अली यांनी जिल्ह्यातील एका इस्लामी संस्थेमध्ये १२ वर्षांच्या इस्लामचा अभ्यासक्रम पूर्ण केला; मात्र नंतर त्यांनी इस्लामचा त्याग केला. अली १ मे या दिवशी कोल्लम् येथे आले होते. येथे तेे ‘एसेंस ग्लोबल’ या संघटनेकडून आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या धार्मिक शिक्षणाच्या वेळी आलेल्या अनुभवावर मार्गदर्शन करणार होते. त्या वेळी काही जणांनी त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ते मार्गदर्शनाला जाऊ शकणार नाही. त्या वेळी त्यांना मारहाण करण्यात आली. त्याचा भ्रमणभाष संच फोडण्यात आला. कपडे फाडण्यात आले. जेव्हा स्थानिक लोकांनी ते पाहिले, तेव्हा त्यांनी आरडाओरड केली. यानंतर पोलिसांनी अली यांची सुटका केली.

 

इस्लामी संस्थेत लैंगिक शोषण ! – अली

यानंतर अली यांनी पोलिसांच्या संरक्षणात कार्यक्रमात मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षणाच्या वेळी माझे लैंगिक शोषण करण्यात आले. मी इस्लाम सोडण्याचा निर्णय माझ्या कुटुंबियांना आवडला नाही. त्यामुळे मी त्यांच्या समवेत रहात नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *