Sign Petition : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे आदी बांधून होणारी अतिक्रमणे तात्काळ हटवावी !

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ! छत्रपती शिवरायांनी आई भवानी आणि गुरु यांचा आशीर्वाद; शौर्य, पराक्रम, गनिमीकाव्याची युद्धनीती आदी स्वकर्तृत्व; तसेच महाराजांवर अतूट निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या त्यागातून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. याच हिंदवी स्वराज्यात महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी बळकावण्याचा ‘लँड-जिहाद’च आहे, असे म्हणावे लागेल.

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंनी या ऑनलाईन याचिकेद्वारा आपल्या मागण्या कराव्या !

देशभक्‍त आणि धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की कृपया खाली दिलेल्या ‘Send Email’ या बटनवर क्लिक करून आपल्या मागण्या इ-मेलद्वारे मा. मुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री, महाराष्ट्रआणि भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक यांना पाठवाव्या ! त्यासह या इ-मेलची एक प्रत (Copy) आम्हाला [email protected] या इमेल पत्त्यावर पाठवावी ! 
(Note : ‘Send Email’ हे बटन केवळ मोबाईलवर क्लिक केल्यानेच कार्यान्वित होते. डेस्कटॉप अथवा लॅपटॉपवर चालत नाही !)

बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर 100 हून अधिक अनधिकृत आर्सीसी असणारी बांधकामे झाल्याचे हिंदु जनजागृती समितीने एक वर्षभरापूर्वी माहितीच्या अधिकरात उघड केले. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांच्यासह राज्यभरात आंदोलनही केले; मात्र ती अतिक्रमणे अद्यापही हटवण्यात आलेली नाहीत. हा अतिक्रमणविरोधी लढा चालू असतांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर अतिक्रमणाच्या माध्यमातून इस्लामी आक्रमण झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्या पाठोपाठ शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्यावरही अनधिकृत थडगे उभारण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यासह पुणे जिल्ह्यातील लोहगडावर मुसलमानांकडून अनधिकृत बांधकाम करून ‘उरूस’ साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असतांना महाराष्ट्र शासनाने अनेक वर्षे त्यावर काहीही कृती केलेली नाही, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामे, मजार, प्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे ‘इस्लामीकरण’ करण्याचा घाट घातला आहे. छत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवले, तरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायला हवेत. या किल्ल्याचे पावित्र्य जपणे आणि किल्ल्याचे संवर्धन करणे, हे शासन तथा भारतीय पुरातत्त्व खाते यांचे दायित्व आहे.

या दृष्टीने किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, विशाळगड आदींप्रमाणे राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे ही धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. मुळात इतकी अतिक्रमणे होईपर्यंत पुरातत्व विभागाचे कर्मचारी काय करत होते किंवा येथे अतिक्रमणे करण्यासाठी पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांचे काही साटेलोटे तर नाही ना, असा येथे प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या मुसलमानांनी ही अतिक्रमणे केली, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी आमची मागणी आहे.

मा. खासदार संभाजीराजे आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नातेवाईक श्री. रघुजीराजे आंग्रे यांनी या प्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे पत्रव्यवहार करून आवाज उठवला आहे. तसेच अनेक दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी संघटना यांनीही आवाज उठवला आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या प्रकरणाची केंद्रीय पथक पाठवून सखोल चौकशी प्रारंभ करावी, अनधिकृत बांधकामे करणार्‍यांवर गुन्हा दाखल करावेत, तसेच सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्यात यावीत आणि किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती करत आहे. अन्यथा हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी देशभरात तीव्र आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल पुरातत्व विभाग आणि शासन-प्रशासन यांनी घ्यावी. या संदर्भात आपल्याकडून झालेल्या कार्यवाहीविषयी आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावे, ही विनंती !​संबंधित बातम्या

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे !

पुरातत्व विभाग आणि शासन यांनी तातडीने त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी मंडळाकडून २ स्वतंत्र निवेदनांद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अलीकडेच करण्यात आली आहे. Read more »

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे. Read more »

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले. Read more »

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा ! – कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांच्या नावे असलेले निवेदन कागल तालुक्यातील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कागल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले. Read more »

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गड-दुर्गांवरील अतिक्रमण’, ‘मेडिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट’ आणि ‘मुंबईतील मालवणी क्रीडासंकुलाचे अनधिकृत नामकरण’ हे विषय चर्चेसाठी घ्यावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने

महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर या विधीमंडळाच्या अधिवेशनात चर्चा होऊन त्या संदर्भातील समस्या सोडवल्या जाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीने काही विषयांचे निवेदन सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षातील आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना दिले. Read more »

धर्मांधांची आक्रमणे रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे स्मरण करा ! – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवरायांनी ५ इस्लामी पदपातशाह्या संपवल्या; मात्र हिंदूंना छत्रपती शिवरायांचा विसर पडल्याने धर्मांधांची आक्रमणे अद्यापही थांबलेली नाहीत. Read more »

गड-दुर्ग संवर्धनासाठी समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – रणजितसिंह निंबाळकर, खासदार, भाजप

‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी विशाळगड पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा दौरा झाल्यानंतर विशाळगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Read more »

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील. Read more »

Know More About this Issue >>

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​