Menu Close

अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धांना हात घालू नये ! – भाजपचे नेते सुजित झावरे

सुजित झावरे यांनी कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, यासाठी आयोजित केलेल्या यज्ञावर अनिंसचा आक्षेप !

सुजित झावरे

नगर – यज्ञ ही केवळ धार्मिक परंपरा नसून त्याला वैज्ञानिक आधार आहे. विशिष्ट वस्तू-पदार्थ वापरून केलेल्या यज्ञातून ऑक्सिजनसह सकारात्मक वातावरण सिद्ध होते. यावर केंब्रिजसारख्या जागतिक दर्जाच्या विश्‍वविद्यालयातून संशोधन करण्यात आलेले आहे. अनेक जण याचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे याला अंधश्रद्धा कसे म्हणता येईल ? असा प्रश्‍न उपस्थित करत भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी ‘अंनिसने अंधश्रद्धा संबोधून आमच्या श्रद्धांना हात घालू नये’, असे पत्रकार परिषदेत म्हटले आहे. ‘हा यज्ञ उदात्त हेतूने केला असून यापुढेही आम्ही असा यज्ञ करू शकतो’, असे प्रतिपादन झावरे यांनी केले आहे.

१. ‘कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे आणि सर्वांना निरामय आरोग्य लाभावे’, यासाठी टाकळी ढोकेश्‍वर (पारनेर) येथील माजी आमदार स्व. वसंतराव झावरे-पाटील कोविड केअर सेंटरमध्ये २० मे या दिवशी सुजित झावरे यांच्या पुढाकारातून विश्‍वशांती आणि लोककल्याणासाठी हा यज्ञ करण्यात आला. ‘अध्यात्मातून निरामय आरोग्याकडे !’ या संकल्पनेतून या यज्ञाचे आयोजन करण्यात आले.

यज्ञ

२. या विश्‍वशांती यज्ञाला अंनिसने आक्षेप घेतला असून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. (हिंदुद्वेषाची कावीळ झालेली अंनिस याहून दुसरे काय करणार ? ‘येशूला शरण गेल्यास कोरोना बरा होतो’, असे सांगत हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अंनिसने अशी तक्रार केल्याचे कधी ऐकले आहे का ? – संपादक  दैनिक सनातन प्रभात)

३. यज्ञात विविध वनौषधींच्या समिधांच्या आहुती देण्यात आल्या. नवग्रहशांती आणि रुद्राभिषेक करून भगवान शंकराला शरण जाऊन साकडे घालण्यात आले.

५. या कोविड केअर सेंटरमध्ये भरती झालेले अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांनीही या सेंटरमुळे आपणास आधार मिळाल्याचे सांगितले.

६. यज्ञासंदर्भात झावरे म्हणाले की, पुरातन काळापासून यज्ञ-यागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होमहवन ही अंधश्रद्धा नसून अग्निद्वारे परमेश्‍वर आणि वैश्‍विक शक्तीला आवाहन करण्याचीही संकल्पना आहे. पूर्वेतिहासात राज्यांवरील संकट टळण्यासाठी शासनकर्त्यांनी होमहवन केल्याचे दाखले आहेत. पर्जन्य यागाद्वारे पाऊस पडत असल्याचा संदर्भ ज्ञानेश्‍वरी ग्रंथातही आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *