Menu Close

#KashmiriHindusExodus_31Yrs हा हॅशटॅग ट्रेंड चौथ्या क्रमांकावर !

विस्थापित काश्मिरी हिंदूंना न्याय देण्याची ट्विटवरून मागणी

मुंबई : काश्मीरमध्ये जिहाद्यांनी १९ जानेवारी १९९० या दिवशी हिंदूंना काश्मीर सोडून जाण्यासाठी धमक्या दिल्या होत्या. ‘काश्मीर सोडा अथवा मरा किंवा इस्लाम स्वीकारा’ असे पर्याय धर्मांधांनी हिंदूंना दिले होते. यानंतर सहस्रावधी हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, तर साडेचार लाख हिंदूंना पलायन करावे लागले. अनेक महिलांवर बलात्कार झाले. आजही हिंदू तेथे रहाण्यासाठी जाऊ शकत नाहीत.

१९ जानेवारी २०२१ या दिवशी या काळ्या दिनाला ३१ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हिंदु धर्माभिमान्यांनी ट्विटरवर  #KashmiriHindusExodus_31Yrs या हॅशटॅग ट्रेंडद्वारे हिंदूंना पुन्हा काश्मीरमध्ये वसवण्याची मागणी केली. हा ट्रेंड राष्ट्रीय ट्रेंडमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. यावर २० सहस्रांहून अधिक लोकांनी ट्वीट्स केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *