हिंदुंनो, कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करून केवळ तुमच्याच उत्सवांच्या मिरवणुकीला पोलिस परवानगी नाकारतात, हे लक्षात घ्या !
अन्य धर्मियांच्या मिरवणुकीला कधी अशी परवानगी नाकारल्याचे एेकवित नाही ! – संपादक, हिंदुजागृती
अहमदनगर : गेल्यावर्षी रामनवमीला शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चालूवर्षी रामनवमीला कोणालाही शहरातून मिरवणूक काढू दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
धार्मिक उत्सवात कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, दुष्काळी परिस्थितीतही कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यसाठी पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. शांततेच्या मार्गाने उत्सव साजरा करण्यास पोलिसांचा अजिबात आक्षेप नाही. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस सहकार्याची भूमिकेत आहेत. परंतु, गेल्यावर्षी रामनवमीला शहरात दोन धार्मिक गटांत वाद होऊन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे चालूवर्षी परवानगी देण्याचा विषयच येत नाही, असे स्पष्ट केले.
चालू वर्षात जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून एकही गंभीर प्रश्न निर्माण झालेला नाही. भविष्यात तसे होऊ नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश देण्यात आले आहेत. सराईत गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध तडीपारी, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत, असेही डॉ. त्रिपाठी म्हणाले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे उपस्थित होते.
संदर्भ : पुढारी