Menu Close

त्र्यंबकेश्‍वर येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानच्या वतीने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार

satkar_purskar_clr
सन्मानचिन्ह स्वीकारतांना समितीचे कार्यकर्ते आणि संस्थेचे साधक

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर : श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी आंदोलन करणार्‍या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या महिलांना पोलिसांनी संगमनेरजवळील नांदूर फाट्याजवळ कह्यात घेतले. यामुळे अनेक ग्रामस्थांनी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार मानले, तसेच येथील कुशावर्तच्या ठिकाणी येथील ॐ शम्भव प्रतिष्ठानने समिती आणि सनातन यांना सन्मानचिन्ह देऊन जाहीर आभार मानले.

तत्पूर्वी कुशावर्त येथील श्री गोदावरी नदीच्या कुंभच्या ठिकाणी समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांच्या हस्ते श्री गंगादेवी अन् श्री गोदावरीदेवी यांची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित पुरोहित ब्रह्मवृंदाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे आभार मानत सन्मानचिन्ह दिले. या वेळी उपस्थित पुरोहितांनी सांगितले, तुम्ही येथे येऊन धर्मरक्षणासाठी जे साहाय्य केले, त्यासाठी हे सन्मानचिन्ह आभार म्हणून देत आहोत. तुमच्या या कार्यात आम्ही सर्वजण साहाय्यासाठी सदैव तत्पर असू.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *