हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त शिरसोली येथे बैठक
जळगाव : पद्मावती चित्रपटाच्या माध्यमातून जागृत हिंदू इतिहासाचे विकृतीकरण सहन करणार नाही. यासाठी मोठे आंदोलन हिंदूंना उभारावे लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. येथील शिरसोली गावात हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. शिरसोली येथील ग्रामस्थ मतभेद दूर करून श्री हनुमान मंदिरासाठी एकत्र आल्याने त्यांचे अभिनंदनही श्री. घनवट यांनी केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘हज यात्रेला अनुदान दिले जाते; मात्र हिंदूंच्या यात्रांवर कर लादले जातात. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी प्लॅटफॉर्म तिकिटांचे शुल्क वाढवले जाते. हिंदू हे किती दिवस सहन करणार आहेत ? काश्मिरी हिंदू ३० वर्षांपासून निर्वासित असतांना रोहिंग्या मुसलमानांना आश्रय दिला जातो. याविषयी राष्ट्रप्रेमी हिंदूंनी जागृत झाले पाहिजे. मुसलमानांची ५२ राष्ट्रे रोहिंग्यांना आश्रय देत नाहीत, तर हिंदुस्थानने काय ठेका घेतला आहे का ?’’
हिंदूंच्या हक्काच्या हिंदु राष्ट्राची मागणी करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन १९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.३० वाजता जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले.
श्री. उदय बडगुजर यांनी सांगितले, ‘‘केरळमधील अथिरा नावाची मुलगी धर्मशिक्षणाच्या अभावाने धर्मांतरित झाली. तरुणींनाही धर्मशिक्षण न मिळाल्याने त्या लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.’’
क्षणचित्रे
१. तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ३०० हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती यांमुळे बैठक म्हणजे छोटी सभाच झाली.
२. गावातील दोन मोठ्या गावांचे नियोजन करण्यात आले असून वाहनफेरीसाठी दुचाकींची नाव नोंदणी करण्यात आली आहे.
३. सभेच्या जागेवरील चौकात भगवे झेंडे लावल्याने वातावरण उत्साही होते.
४. बैठकीसाठी धर्मप्रेमी श्री. गोपाल ताडे यांनी तंबू आणि बैठक व्यवस्था विनामूल्य उपलब्ध करून दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात