Menu Close

बांगलादेशमध्ये ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक !

हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात बांगलादेश पोलिसांची मोहीम

bomb_arrestढाका : गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली आहे. हिंदूंवर आक्रमण करणार्‍या प्रत्येकाला कठोर शिक्षा करू, असा निर्धार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केला आहे.

१. पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटले आहे की, बांगलादेशसारख्या छोट्या देशात गुन्हेगार कुठेही दडून बसले, तरी त्यांना शोधणे तितकेसे अवघड नाही. आमचे पोलीस त्यांना शोधून काढतील आणि हिंसाचाराचा नायनाट करतील.

२. प्रत्येक गुन्हेगारास आणि बोलवित्या धन्यास कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. अशा वेळी नागरिकांनी निष्क्रीय न रहाता आक्रमणकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न करावा. बहुतेक आक्रमणकर्ते दुचाकीवरून येतात. अशा वेळी नागरिकांनी पुढे येऊन त्यांना पकडले पाहिजे. शासन आणि पोलीस तुमच्या पाठीशी असेल.

३. अटक केलेल्या ३७ आतंकवाद्यांपैकी २७ जण जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य आहेत. हिंदूंच्या झालेल्या हत्यांना तेच उत्तरदायी असल्याचा संशय आहे.

४. अटक केलेल्यांपैकी इतर जण चोर-गुन्हेगार आहेत. या कारवाईमध्ये बांगलादेशचे गुन्हेविरोधी रॅपिड अ‍ॅक्शन बटालियन आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांचेही साहाय्य घेण्यात आले होते.

५. हिंदूंच्या हत्यांचे इस्लामिक स्टेट आणि अल कायदा इन द इंडियन पेनीन्सुला या संघटनांनी दायित्व घेतले होते; मात्र देशात या संघटनांचे कोणतेही अस्तित्व नाही, असे बांगलादेश शासनाने म्हटले आहे.

६. जमात-ए-इस्लामी या संघटनेचा पाठिंबा असलेल्या बांगलादेशातील विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपीने) पंतप्रधानांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. ही कारवाई म्हणजे राजकीय विरोधकांना संपवण्याचे कारस्थान आहे, अशी टीका केली आहे. (हिंदूंच्या होणार्‍या हत्यांच्या विरोधात आणि हत्या करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी बीएनपीने काय प्रयत्न केले ? जमात-ए-इस्लामीला बीएनपी विरोध का करत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

७. बीएनपीचे सरचिटणीस फखरूल इस्लाम आलमगीर म्हणाले, आतंकवाद्यांच्या नावाखाली आमच्या पक्षाच्या सहस्रो कार्यकर्त्यांची धरपकड झाली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *