Menu Close

बिलिव्हर्सवाल्यांची अवैध प्रार्थना रोखणार्‍या म्हापसा (गोवा) येथील रहिवाशांच्या विरोधात गुन्हा नोंद !

म्हापसा पोलिसांची सालाझारशाही !

पोलीस बांधकाम व्यावसायिकाच्या खोट्या तक्रारीची तत्परतेने नोंद घेतात; मात्र अवैधपणे प्रार्थना घेणार्‍या बिलिव्हर्सवाल्यांवर कारवाई करणे टाळतात ! पोलीस आणि बिलिव्हर्सवाले यांच्यात काही साटेलोटे आहे का ?

police_chaukashiम्हापसा (गोवा) : म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्‍या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे. बिलिव्हर्स पंथियांच्या आहारी गेलेले इमारतीचे बांधकाम व्यावसायिक विजय देशमुख यांच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी या इमारतीतील ५ रहिवाशांच्या विरोधात तक्रार (एफ्.आय.आर्) नोंद केली आहे.

१. पोलिसांनी फेअर, आल्त, म्हापसा येथील देशमुख आर्केड कॉ-ओप हाऊसिंग सोसायटीतील अश्‍विनी परब, सिद्धार्थ कांबळी, अशोक बाणावलीकर आणि सौ. नीना बाणावलीकर, प्रशांत पराडकर यांच्या विरोधात अवैधपणे जमाव जमवणे आणि देशमुख अन् त्यांचे नातेवाइक यांना इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखणे या गुन्ह्यांखाली तक्रार नोंद केली आहे.

२. संकुलात बिलिव्हर्सना प्रार्थना करू न देण्याचा निर्धार करून या रहिवाशांंनी ५ जून या दिवशी बिलिव्हर्सना रोखले होते.

३. रहिवासी इमारतीच्या तळमजल्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अवैधपणे बिलिव्हर्सच्या प्रार्थना होत होत्या आणि या प्रार्थनांना येणार्‍या ४० जणांच्या जमावामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

४. मागील रविवारी सोसायटीतील रहिवाशांनी इमारतीच्या दरवाजाला टाळे ठोकले आणि बिलिव्हर्सना प्रार्थनेसाठी इमारतीत घुसू दिले नाही. यानंतर पुन्हा ५ जून या दिवशीही रहिवाशांनी बिलिव्हर्सवाल्यांना रोखले.

५. बिलिव्हर्सच्या या प्रार्थनांना अनुसरून रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे सुनावणी चालू आहे. त्यांनी सुनावणी होईपर्यंत प्रार्थना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे, असे असतांना बिलिव्हर्स अवैधपणे या प्रार्थना घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *