धर्मांतर होण्यामागील हिंदूंचे दोष

हिंदुस्थानात सहदााो वर्षांपासून धर्मांतराची समस्या बळावण्यामागे हिंदूंचेही काही दोष आणि अन्य कारणे आहेत. धर्मांतराची समस्या संपुष्टात आणण्यासाठी हिंदु समाजाने या दोषांविषयी अंतर्मुख होऊन त्यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.

१. आर्थिक दुर्बलता

दरिद्री व्यक्तीला धर्मांतर केल्यास प्रतिमास पैसे देण्याचे आमीष अहिंदूंच्या संघटना दाखवतात. घरात कोणी कमावते नसल्यास, घरात कोणी व्याधीग्रस्त असल्यास त्याच्या उपचारार्थ अथवा स्वतःचे दारिद्र्यमय जीवन सुखमय करण्यासाठी हिंदूंनी धर्मांतर केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

(आर्थिक लाभापोटी धर्मांतर करणे, हा समस्या सोडवण्याचा मार्ग नाही, तर साधना करून प्रारब्धाची तीव्रता न्यून करणे, हा खरा मार्ग आहे. – संकलक)

२. जात्यंधांकडून होणारा अपप्रचार

हिंदु धर्म हा ‘ब्राह्मणी धर्म’ असून तो बहुजनांवर अत्याचार करतो, असा अपप्रचार काही ब्राह्मणद्वेषी जात्यंध आणि त्यांच्या संघटना करतात. त्यामुळे त्या समुदायातील हिंदू स्वधर्मापासून दूर जाऊन पुढे नवबौद्ध वा शिवधर्मवादी बनतात आणि हिंदु धर्माचा तिरस्कार करतात.

३. धर्मशिक्षणाचा अभाव

‘हिंदूंचे धर्मांतर होणे, हे हिंदुत्ववादी संघटना अन् पक्ष यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचे आणि त्यांच्यात धर्माभिमान निर्माण न केल्याचे दृश्य फळ आहे.’ – डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

४. धर्माभिमानाचा अभाव

हिंदुस्थानात हिंदू बहुसंख्य असूनही ‘हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे’, असा संस्कार स्वातंत्र्यानंतरच्या सर्व पिढ्यांवर झाल्यामुळे हिंदूंमधील धर्माभिमान लोप पावत गेला. धर्माभिमानाच्या अभावामुळे या पिढ्यांवर पाश्चात्त्यांचा भोगवाद आणि चंगळवाद यांचा पगडा बसला. या सर्व परिस्थितीचा लाभ घेऊन अहिंदूंनी धर्मांतराचे कार्य वाढवले. याउलट मुसलमानांमध्ये धर्माभिमान असल्याने त्यांचे धर्मांतर झाले नाही.

५. अतीसहिष्णूवृत्ती

अन्य पंथियांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराचा निषेध करण्यासाठी हिंदू संघटितपणे पुढे आले नाहीत आणि आजही येत नाहीत.

६. दूरदृष्टीचा अभाव

‘बाटगे अधिक कडवे असतात’, याला बाटवणार्‍यांसह बाटल्या जाणार्‍यांचा दूरदृष्टीहीन समाजही कारणीभूत असतो. एखादा हिंदू आमिषाला बळी पडून धर्मांतर करतो, तेव्हा त्या व्यक्तीला बहिष्कृत करण्याचे काम हिंदु समाज करतो. मिशनर्‍यांनी वाढवलेला अहंकार आणि मूळ धर्मियांचा बहिष्कार बाटग्यांचा कडवेपणा वाढवण्यास कारणीभूत ठरतो. पुढे हेच बाटगे त्यांनी नव्याने स्वीकारलेल्या धर्माचा हिरीरीने  प्रसार करतात. स्वतःचा मूळ धर्म, संस्कृती, परंपरा, पूर्वज इत्यादींची ते टवाळी करतात.’ – श्री. संदीप रामकृष्ण गावडे, शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग)

७. निधर्मी शासनाचे भेदभावाचे धोरण

‘सर्वसाधारणपणे हिंदुस्थानात धर्मांतराला बळी पडणारे हिंदु असतात. त्यांचे धर्मांतर झाले, तर शासनाचे काही बिघडत नाही; मात्र मुसलमानांचे वा खिस्त्यांचे धर्मांतर झाले, तर ते निधर्मी शासनाच्या दृष्टीने अवैध ठरते.’ – मासिक ‘हिंदु व्हॉईस’ (मार्च २००६)

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण