धर्मांतराचे दुष्परिणाम

१. सामाजिक

अ. कंधमल (ओडिशा) येथील वन्य जमातींचे धर्मांतर झाल्यावर दिसून आलेला दुष्परिणाम

‘धर्मांतरितांच्या राहणीमानात विलक्षण पालट झाल्यामुळे कंधमल (ओडिशा) येथे खिस्ती झालेल्या जमाती आणि तेथील परंपरागत समाज यांमध्ये दुहीची दरी निर्माण झाली.’ – दैनिक ‘राष्ट्रीय सहारा’, (६.७.२००९)

आ. बहुसंख्यांक झालेल्या खिस्त्यांच्या धर्मांधतेचा सामाजिक जीवनावर दुष्परिणाम होणे

नागभूमी येथे खिस्त्यांचा धार्मिक दिवस असलेल्या रविवारी कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. त्या दिवशी बसगाड्याही बंद असतात. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतावर रविवारी काम करता येत नाही. काम केल्यास त्यांना ५ सहदाा रुपये दंड भरावा लागतो अन् २५ फटक्यांची शिक्षा दिली जाते.

इ. खिस्ती बहुसंख्यांक झालेल्या मेघालयात केंद्रशासनाच्या नियमांना खिस्ती धर्माचा संदर्भ जोडला जाणे

‘मेघालय राज्यात केंद्रशासनाच्या नियमानुसार रविवारी सुटी दिली जाते; मात्र याविषयी मेघालय शासनाच्या ग्रामीण विकास विभागाच्या अप्पर सचिव श्रीमती एम्. मणी यांनी एका लेखी उत्तरात म्हटले, ‘आमचे राज्य हे खिस्ती असल्याने आमच्याकडे रविवारी सर्वांना सुटी असते.’ मंगरूळनाथ येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्री. हरिश्चंद्र पवार यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर देण्यात आले.’

२. सांस्कृतिक

अ. मूळ नाग संस्कृती विसरून नाग लोक पाश्चात्त्य मानसिकतेच्या प्रभावाखाली येणे

‘नागभूमी (नागालँड) येथे बाप्टिस्ट मिशनर्‍यांनी स्थानिक नाग लोकांना खिस्ती पंथाची दीक्षा दिली आणि त्यांना नाग संस्कृतीपासून तोडले. त्यांचे लोकसंगीत, लोकनृत्य, लोककथा आणि धार्मिक लोकपरंपरा यांचा, पर्यायाने त्यांच्या संस्कृतीचा विनाशही या मिशनर्‍यांनी केला. त्यांनी नाग लोकांना पूर्णपणे पाश्चात्त्य मानसिकतेच्या प्रभावाखाली आणले.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर

आ. मिझोरममध्ये पारंपरिक वाद्यांवर बहुसंख्यांक झालेल्या खिस्त्यांनी बंदी लादणे

मिझोरममध्ये मिझो राजाच्या ढोलासारखे पारंपरिक वाद्य वाजवण्यावर खिस्ती संघटनांनी बंदी आणली. ‘राजाने ही परंपरा राखल्यास त्याला वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागेल’, अशी धमकीही तेथील खिस्त्यांनी दिली.

इ. धर्मांतर केलेल्या हिंदूंनी स्वदेश अन् स्वसंस्कृती यांचा तिरस्कार करणे

‘धर्मांतर केलेले हिंदू ‘हिंदुस्थान’ नव्हे, तर ‘रोम’ ही पुण्यभूमी मानून हिंदुस्थानातील पवित्र नद्या, पर्वत, नागरिक, राष्ट्रभाषा, वेशभूषा अन् संस्कृती यांचा तिरस्कार करू लागले आहेत.’ – खिस्ती स्वातंत्र्यसेनानी राजकुमारी अमृत कौर

र्इ. इस्लामी आक्रमकांनी नगरांची नावेही बाटवून त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट करणे

धर्मांतरामुळे सांस्कृतिक जीवनविषयक संकल्पना पालटतात. हा नियम व्यक्तींनाच नाही, तर नगरांनाही लागू होतो. इस्लामी आक्रमकांनी औरंगाबाद, हैद्राबाद, अलाहाबाद यांसारख्या कित्येक ठिकाणच्या हिंदूंसह त्या नगरांच्या नावांचेही इस्लामीकरण केले आणि त्यांची सांस्कृतिक ओळख नष्ट केली.

उ. संस्कृती संपूर्णतः नष्ट होणे

 • १. अग्नीपूजक असलेल्या पारशी लोकांचे मूळ स्थान असलेल्या इराणमध्ये इस्लामी आक्रमकांनी अत्याचार करून धर्मांतर घडवले आणि धर्मांतर न करणार्‍यांना पळवून लावले. त्या पारशांना हिंदुस्थानने आश्रय दिला. आज इराणमध्ये पारशी संस्कृती औषधालाही शेष नाही.
 • २. खिस्तीकृत धर्मांतराद्वारेच रोम आणि ग्रीक संस्कृती नष्ट झाल्या.
 • ३. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आप्रिâका आणि रशिया येथील आदिवासी संस्कृती नष्ट होणे : खिस्ती धर्मप्रचारकांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आप्रिâका आणि रशिया येथील कोट्यवधी भोळ्याभाबड्या आदिवासींना बाटवण्यासाठी वा बाटवून त्यांची संस्कृती, चारित्र्य, जीवनपद्धती, जीवनमूल्ये आणि संस्था नष्ट-भ्रष्ट केल्या.

३. राजकीय

अ. लेबेनॉन देशात धर्मांतरामुळे सत्तांतर होणे

लेबेनॉन हा लहानसा देश एकेकाळी खिस्तीबहुल होता. आज तो मुसलमानबहुल झाला आहे. तेथील खिस्ती परागंदा होत असून खिस्ती देशांच्या आश्रयाला जात आहेत. वर्ष १९०० मध्ये लेबेनॉनमध्ये ७७ टक्के खिस्ती होते, २०११ मध्ये त्यांचे प्रमाण ३९ टक्क्यांवर आले. १९०० मध्ये तेथे मुसलमान २१ टक्के होते, आता ते ६० टक्के झाले आहे. वर्ष १९४३ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन झालेल्या सर्वपक्षीय मंत्रीमंडळातील प्रमुख खात्यांपैकी ६ खाती खिस्त्यांना, तर ५ खाती मुसलमानांना देण्यात आली होती. राज्यकारभारात मिळालेला अधिकार मुसलमानांनी लेबेनॉनमध्ये त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी वापरला. त्यांनी लोकसंख्येत परिणामकारक वाढ केली आणि ते देशात बहुसंख्यांक झाले. वर्ष २००९ मध्ये तेथील पारंपरिक खिस्ती पक्षाचे शासन सत्तेवरून पायउतार होऊन कट्टर इस्लामी विचारसरणीच्या ‘हिजबुल्लाह’ पक्षाचे शासन तेथे आले. लेबेनॉन देशात धर्मांतरामुळे सत्तांतर झाले.

४. राष्ट्रीय

अ. धर्मांतरितांची मानसिकता राष्ट्रविरोधी होणे

 • १. ‘अनेक धर्मांतरित व्यक्ती आता राष्ट्रविरोधी झाल्या आहेत.’ – खिस्ती स्वातंत्र्यसेनानी राजकुमारी अमृत कौर
 • २. ‘आज मेघालय, मिझोरम, त्रिपुरा आणि मणीपूरचा डोंगराळ भाग अन् काही प्रमाणात अरुणाचल प्रदेशात धर्मांतरित जनजातींमध्ये राष्ट्रविरोधी भावना प्रकर्षाने जाणवते.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर

आ. धर्मांतराने राष्ट्रांतर होणे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर होय’, ही चेतावणी देऊन अनेक वर्षे जनजागृती केली. ही चेतावणी किती अचूक होती, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

 • १. नागालँड
  • अ. खिस्ती धर्मात धर्मांतरित झालेल्या बंडखोरांमुळे नागालँडची निर्मिती होणे : ‘हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच अंगामी झापो फिझो या खिस्त्याच्या नेतृत्वाखाली नाग बंडखोरांनी सशस्त्र बंड पुकारले. ‘नागालँड फॉर खाईस्ट’ ही त्यांची धर्मांध युद्धघोषणा होती. या नाग बंडखोरांना शस्त्रास्त्रे आणि अन्य प्रकारचे साहाय्य पुरवण्याचे दुष्कर्म मायकेल स्कॉट या खिस्ती मिशनर्‍याने केले. बाप्टिस्ट मिशनर्‍यांच्या प्रभावाखालील या फुटीरवाद्यांच्या सर्व मागण्या निधर्मी शासनाने मान्य केल्या आणि नागालँड राज्याची निर्मिती झाली.’ – श्री. विराग श्रीकृष्ण पाचपोर
  • आ. ‘नागालँडमध्ये ‘र्‍aुaत्aह् ांत्दहुे ूद वेल्े ण्प्rग्ेू ! ँत्दद्ब् घ्ह्ग्aह ्दुे ुाू त्देू !’ म्हणजे ‘नागालँड ही येशू खिस्ताची भूमी आहे. मूर्ख भारतीय कुत्र्यांनो, येथून चालते व्हा !’ अशा घोषणा जागोजागी लिहिलेल्या आहेत.’
  • इ. ‘स्वतंत्र खिस्ती राज्य मिळाल्यानंतर फुटीरवादी खिस्त्यांनी स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी करण्यासाठी देशाविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले.’ – डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे (दैनिक ‘तरुण भारत’, १५.६.२००८)
 • २. काश्मीर
  • अ. मुसलमानबहुल काश्मीरचे होत असलेले राष्ट्रांतर ! : हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये बहुसंख्यांक असलेल्या मुसलमानांनी काश्मीरसाठी वेगळी घटना अन् दंडविधान (कायदे) करण्याचा अधिकार पदरात पाडून घेतला. ‘स्वतंत्र काश्मीर राष्ट्र’, हे काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रविरोधी कृती करून पाकशी संधान बांधले. परिणामी काश्मिरी मुसलमानांमध्ये फुटीरवादी मानसिकता बळावली. फुटीरवादी ‘हुरियत कॉन्फरन्स’ या संघटनेने ‘आझाद काश्मीर’चा प्रचार आरंभला. स्वतंत्र काश्मीर राष्ट्र स्थापण्यासाठी ‘जम्मू काश्मीर मुक्ती मोर्चा’ (जेकेएल्एफ्) इत्यादी आतंकवादी संघटनांचा उदय झाला. त्यामुळे आज तेथे राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रध्वज फडकावणेही कठीण झाले आहे.
 • ३. आंतरराष्ट्रीय दाखले
  • अ. ईस्ट टिमोर : ‘२०.५.२००२ या दिवशी इंडोनेशिया या इस्लामी राष्ट्राची फाळणी होऊन ‘ईस्ट टिमोर’ या लहान खिस्ती राष्ट्राची निर्मिती झाली.
  • आ. दक्षिण सुदान : ९.७.२०११ या दिवशी सुदान या इस्लामी राष्ट्राची फाळणी होऊन ‘दक्षिण सुदान’ या नव्या खिस्ती राष्ट्राची निर्मिती झाली. २० वर्षे अमेरिकेतील खिस्ती धर्मगुरूंनी सुदानमधील दक्षिण प्रांतातील दरिद्री मुसलमानांचे खिस्तीकरण केले. या प्रांतात खिस्त्यांची लोकसंख्या ९० टक्के झाल्यावर तेथील चर्चने सुदानपासून वेगळ्या स्वतंत्र खिस्ती राष्ट्राच्या निर्मितीची मागणी केली.’

५. धार्मिक

अ. बाटगे अधिक कडवे असल्याने हिंदु समाजाच्या शत्रूंत वाढ

 • १. ‘हिंदु समाजातील एक व्यक्ती मुसलमान किंवा खिस्ती बनते, याचा अर्थ असा नाही की, एक हिंदू घटतो, तर उलट हिंदु समाजाचा आणखी एक शत्रू वाढतो.’ – स्वामी विवेकानंद
 • २. धर्मांतरित हिंदूंचा हिंदु संतांच्या स्मृतींना विरोध
  • अ. तामिळनाडू राज्यातील खिस्ती धर्मीय झालेल्या कोळी समाजाने स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभे करायला विरोध केला.
  • आ. कालडी (केरळ) या आद्य शंकराचार्यांच्या गावी त्यांच्या नावाने अभ्यास केंद्र काढण्यास खिस्ती झालेल्या तेथील गावकर्‍यांचा विरोध आहे.
 • ३. बाटग्या मुसलमानांकडून अत्यंत कडवेपणाने हिंदूंची हत्याकांडे आणि धर्मांतर ! : इस्लामी आक्रमणांच्या वेळी प्राणभयाने किंवा धनलोभाने धर्मांतर केलेल्या धर्मभ्रष्ट हिंदूंनीच पुढे अत्यंत कडवेपणाने हिंदूंची हत्याकांडे घडवली आणि असंख्य हिंदूंना मुसलमान बनवले. अल्लाउद्दीनचा सेनापती मलिक काफूर, जहांगीरचा सेनापती महाबतखान, फीरूजशहाचा वजीर मखबूलखान, अहमदाबादचा सुलतान मुझफ्फरशहा आणि बंगालचा काळा पहाड हे मूळचे हिंदु होते. त्यांनी मुसलमान झाल्यानंतर हिंदु धर्मावर कठोर आघात आणि हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले.
 • ४ बाटलेल्या गांधीपुत्राकडून कडवेपणाने हिंदूंचे धर्मांतर ! : ‘मोहनदास गांधी यांचा मुलगा हरिलाल याने मुसलमान झाल्यानंतर अनेक हिंदूंना मुसलमान केले. त्याने ‘पिता मोहनदास आणि आई कस्तुरबा यांनाही मुसलमान करीन’, अशी प्रतिज्ञा केली होती.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
 • ५. धर्मांतरित मुसलमानांमुळे काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद ! : इस्लामी आक्रमकांच्या टोळधाडीत बहुतांश काश्मीर खोरे बाटले. या बाटग्या मुसलमानांच्या पुढच्या पिढ्यांनी वर्ष १९८९ मध्ये हिंदूंना ‘धर्मांतरित व्हा किंवा काश्मीर सोडा’, अशी चेतावणी दिली. परिणामी साडेचार लक्ष हिंदूंनी काश्मीर सोडले, तर १ लक्ष हिंदू जिहाद्यांकडून ठार झाले. आज काश्मीरमध्ये हिंदू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आ. हिंदूंचा वंशनाश होण्याचा धोका !

‘हिंदूंचे धर्मांतर वेगाने होत राहिले, तर १०० वर्षांनी ‘पारशी पंथ होता’, असे ज्याप्रमाणे आता म्हणतात, त्याप्रमाणे ‘हिंदु धर्म होता’, असे म्हणायची पाळी येईल; कारण धर्मांतरामुळे हिंदू जेव्हा राष्ट्रात अल्पसंख्यांक होतील, तेव्हा त्यांना ‘काफीर’ म्हणून ठार केले जाईल.’ – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

६. जागतिक अशांतता

अ. ‘अनेक टाळण्यासारखे संघर्ष धर्मांतरामुळेच उद्भवतात.’ – म. गांधी

आ. ‘धर्मांतरच जगातील संघर्षाचे मूळ कारण आहे. जर जगात धर्मांतर नसेल, तर निश्चितच संघर्षही नसेल.’ – श्री. एम्.एस्.एन्. मेनन (साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, ६.५.२००७)

इ. ‘मध्ययुगातील अनेक युद्धे धर्मपरिवर्तनामुळेच झाली आहेत.’ – (पत्रिका ‘हिन्दू-जागृति से संस्कृति रक्षा’)

र्इ. जगातील सर्वाधिक रक्तपात धर्मांतरामुळे ! : ‘जगात आतापर्यंत झालेल्या युद्धांत जेवढा रक्तपात झाला नसेल, तेवढ्या प्रमाणात खिस्ती आणि मुसलमान या दोन धर्मियांनी केलेल्या बाटवाबाटवीत रक्ताचे सिंचन झाले.’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण