लव्ह जिहाद : हिंदू तरुणी, स्त्रिया आणि पालक यांनी घ्यावयाची दक्षता

१. हिंदू तरुणींनी आणि स्त्रियांनी घ्यावयाची दक्षता

अ. कठीण प्रसंगी उपस्थित हिंदूंकडून साहाय्य मिळावे, यासाठी कपाळावर प्रतिदिन कुंकू लावा !

आ. मुसलमान मित्र वा शेजारी असल्यास त्यांच्यापासून सावध रहा !

इ. वासनांधांपासून स्वरक्षण करण्यासाठी कराटे, नानचाकू आदी स्वसंरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण घ्या !

२.  हिंदू पालकांनी घ्यावयाची दक्षता

अ. मुलीच्या शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनाविषयी जाणून घ्या !

१. मुलीच्या दैनंदिन वागण्यावर लक्ष ठेवा. तिच्या शाळा किंवा महाविद्यालय यांच्या वेळांची नोंद स्वतःजवळ ठेवा !

२. मुलीचे मित्र आणि मैत्रिणी यांचे संपर्क क्रमांक स्वतःकडे असू द्या. वेळोवेळी त्यांच्याकडून स्वतःच्या मुलीच्या वर्तनाविषयी जाणून घ्या !

३. ‘स्कार्फ’ बांधल्याने दुचाकीवरील ‘लव्ह जिहादी’च्या मागे बसलेल्या मुलीला ओळखणे कठीण जाते, हे लक्षात ठेवून तिच्या ‘स्कार्फ’ बांधण्याविषयी दक्षता घ्या.

४. महाविद्यालयातील कार्यक्रमांत अन्य मुलांसह मुलगी सहभागी होत असल्यास, त्याविषयी जाणून घ्या !

५. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालय यांच्या परिसरात घुटमळणार्‍या अनोळखी मुसलमान युवकांची माहिती त्वरित हिंदुत्ववादी संघटनांना द्या !

आ. मुलीला सुखसुविधांची साधने विचारपूर्वक उपलब्ध करून द्या !

१. नवी वेषभूषा, अलंकार, महागडा ‘मोबाईल’, ‘कॅमेरा’ इत्यादी वस्तूंची मुलीला असलेली आवश्यकता अभ्यासून मगच त्या तिला उपलब्ध करून द्या !

२. `लव्ह जिहाद’ची काही प्रकरणे ही ‘मोबाईल’च्या साहाय्याने घडली असल्यामुळे ‘आपल्या मुलीच्या ‘मोबाईल’वर कोणाचे दूरध्वनी येतात’, याची अधूनमधून पडताळणी (तपासणी) करा !  मुलीच्या ‘मोबाईल’मध्ये ‘सेव्ह’ केलेला ‘लव्ह जिहादी’ मुलाचा क्रमांक खोट्या नावाने असू शकतो, हेही लक्षात असू द्या !

इ. मुलीशी सातत्याने सुसंवाद साधून तिला मनमोकळे बोलू द्या !

१. वयात येण्याच्या काळात मुलीत शारीरिक अन् मानसिक पालट होत असतात. या काळात तिला प्रेमाने वागवा. तिच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करा !

२. प्रतिदिन मुलीशी थोडा वेळ अनौपचारिक संवाद साधून तिच्या मनातील जाणा अन् तिने सहज संवाद साधावा, असे कौटुंबिक वातावरण निर्माण करा !

ई. लहानपणापासून मुलीला धर्मशिक्षण देऊन सुसंस्कारित करा !

धर्मशिक्षणाचा अभाव आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे यांमुळे हिंदू मुली धर्मांतरित होतात, यासाठी

१. लहानपणापासून मुलीवर हिंदू धर्मातील कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नीतीमूल्यांचे संस्कार करा !

२. हिंदू कुटुंबात आणि हिंदुस्थानात जन्म झाल्याचा अभिमान मुलीमध्ये जागवा !

३. हिंदू सभ्यतेला साजेल, अशी वेशभूषा करण्याचा संस्कार मुलीवर करा !

४. धर्मसत्संग, राष्ट्रपुरुषांविषयीचे कार्यक्रम आदी उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी मुलीला प्रोत्साहन द्या !

५. हिंदु संस्कृती, हिंदु धर्मातील ग्रंथ, हिंदु धर्माचा इतिहास, हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आदी गोष्टींचे महत्त्व मुलीला समजावून सांगा !

६. मुलीला हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक परंपरा यांचे शिक्षण म्हणजेच धर्मशिक्षण द्या आणि धर्माचरणी बनवा !

उ. मुलीला मुसलमान स्त्रीच्या यातनामय जीवनाची ओळख करून द्या !

`बहुपत्नीत्व, बुरखा, तलाक, आर्थिक परावलंबित्व, मारहाण आणि मुलांचे लटांबर, हे मुसलमान स्त्रीच्या वाट्याला असलेले दैनंदिन भोग आहेत. त्याची जाणीव प्रत्येक हिंदू पालकाने त्यांच्या मुलींना वयात येण्याच्या काळात करून द्यायला हवी. – डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे.

ऊ. ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याची ओळख मुलीला करून द्या !

‘मुलीला केवळ हिंदु धर्माची महती सांगितल्याने धर्मांतरे थांबणार नाहीत. ती थोपवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’च्या धोक्याची ओळख मुलीला करून द्या.’ – श्री. समीर दरेकर

ए. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू शकणारी किंवा बळी पडलेल्या मुलीचे रक्षण असे करा !

‘लव्ह जिहाद’ला बळी पडू शकणार्‍या किंवा बळी पडलेल्या हिंदू मुलींची वर्गवारी आणि त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.

१. स्वाभाविक मैत्रीच्या भावनेने मुसलमान मुलांच्या संपर्कात असणारी मुलगी : अशा मुलीमध्ये तिच्या हिंदू मैत्रिणी, मित्र, प्राध्यापक आणि पालक यांच्या साहाय्याने जागृती करावी.

२. मुसलमान मुलांशी असलेल्या दाट मैत्रीमुळे त्यांच्याशी शारीरिक जवळीक निर्माण झाल्याने सारासार विचार गमावलेली मुलगी : अशा मुलीवर वशीकरण किंवा करणी यांचा प्रयोग झाला आहे, असे वाटल्यास या लेखात सांगितल्याप्रमाणे आध्यात्मिक उपाय करावेत. नंतर मुलीचा सुयोग्य हिंदू मुलाशी विवाह करावा.

३. पळवून नेलेली मुलगी : पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवावी. हिंदू मुलीचे वय १८ वर्षांहून अधिक असेल, तर ‘ती तिच्या इच्छेने पळून गेली’, असे नोंदवून पोलीस अदखलपात्र गुन्हा नोंदवतात. त्यामुळे गुन्हा नोंदवतांनाच ‘मुलीला पळवून नेले’, असे पालकांनी सांगणे आवश्यक आहे.

३ अ. ‘लव्ह जिहाद’च्या तक्रार नोंदवण्यासंदर्भात कायदेशीर सूत्रे जाणा !

१. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच सज्ञान झाल्याविना तरुण-तरुणींनी स्वेच्छेने धर्म पालटणे, हा कायद्यानुसार अपराध ठरतो. त्यामुळे सज्ञान नसतांना धर्मांतर करून अन्य धर्मियाशी केलेला विवाह आणि धर्मांतर कायद्यान्वये अवैध ठरतो. अशा प्रकरणांत संबंधितांचे पालक ‘मुलीचे बळाने धर्मांतर किंवा विवाह झाले’, अशी तक्रार करू शकतात.

२. सज्ञान झाल्यानंतर, म्हणजेच तिच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तरुणीने बलपूर्वक धर्मांतर झाल्याची तक्रार तिने केली, तर ते धर्मांतर अवैध ठरते. धर्मांतर अवैध ठरल्यामुळे झालेला निकाहही अवैध ठरतो.

३. स्वतःच्या झालेल्या छळाविषयी कुठल्याही तरुणीने गार्‍हाणे दिल्यास संबंधित आरोपी कोणत्याही धर्माचा असला, तरी तो पुढील कलमांनुसार शिक्षेस पात्र ठरतो. अ. बलात्कार करणे (भादंवि ३७५, ३७६) आ.फसवणूक करणे (भादंवि ४१५ ते ४२०) इ. अपहरण करणे (भादंवि ३५९) ई. संमतीविरुद्ध अश्लील प्रसंगाचे छायाचित्र काढणे वा चित्रीकरण करणे आणि त्याच्या साहाय्याने युवतीला प्रतिमाहनन करण्याच्या धमक्या (ब्लॅकमेलिंग) देणे

४. एखादी तरुणी हरवली, तर शेजारीही पोलिसात फिर्याद नोंदवू शकतात.

५. हिंदू विवाहित स्त्रीने किंवा पुरुषाने घटस्फोट न घेता धर्मांतर करून दुसरा विवाह केल्यास पहिला विवाह विच्छेद न झाल्याने दुसरा विवाह भारतीय दंडसंहिता कलम ४९४ आणि ४९५ यांनुसार धर्मांतर करूनसुद्धा अनधिकृत ठरतो.

एे. ‘लव्ह जिहादी’कडून फसवणूक झाल्याचे ओळखून परत आलेली मुलगी

अशा मुलीचा विवाह आणि धर्मांतर झाले असल्यास त्याविषयीच्या कायदेशीर अडचणी सोडवून तिला स्वधर्मात विधिवत प्रवेश द्यावा. अशा मुलीचा आत्मविश्वास हरवलेला असल्याने तिला समुपदेशन करण्यासाठी मानसोपचारतज्ञाचे साहाय्य घ्यावे. तसेच तिचे आर्थिकदृष्ट्या पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न करावेत.

संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लव्ह जिहाद (धर्मसंकटाचे स्वरूप आणि उपाय)’