जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल

जनतेने मताधिकार वापरून एखाद्या रुग्णाला औषध द्यायचे ठरवणे याला मूर्खपणा म्हणता येईल. त्याचप्रमाणे राष्ट्र आणि धर्म मृत्यूशय्येवर असतांना तशा जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करणे, याला महामूर्खपणा म्हणता येईल.

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना ईश्‍वरचरणी स्थान मिळावे, असे वाटते

बहुतेक हिंदुत्ववाद्यांना एखाद्या संघटनेत पद मिळावे, आमदार-खासदार बनावे, असे वाटते. याउलट सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना ईश्‍वरचरणी स्थान मिळावे, असे वाटते !

बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांची राजकारण्यांप्रमाणे खेळी !

राजकारणी दुसर्‍या पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी पक्षातील एखादे चांगले पद देऊ करतात. त्याप्रमाणे आता बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनाही छोट्या हिंदुत्ववादी संघटनांमधील चांगल्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेत आणण्यासाठी संघटनेतील एक चांगले पद देऊ करत आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, बलाढ्य हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आता चांगले कार्यकर्ते तयार करण्याची क्षमता उरलेली नाही.

जनतेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी न बनवता भारतात लोकशाही पद्धत राबवणार्‍या राजकारण्यांमुळे देश पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे

जनतेला राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी न बनवता भारतात लोकशाही पद्धत राबवणार्‍या राजकारण्यांमुळे देश पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.

स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?

मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?

साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.

राजकीय पक्ष हे देऊ, ते देऊ, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.

त्यागी अन् नम्र साधकांनी राष्ट्राची उभारणी करणे

भ्रष्टाचार न करणारे, अहंभाव नसलेले आणि साधना करणारे एकातरी राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते आहेत का ? याचे उत्तर “नाही” असेच आहे. त्यांच्यामुळेच राष्ट्र आणि धर्म यांची परमावधीची अधोगती झाली आहे. यावरचा उपाय एकच आहे आणि तो म्हणजे त्यागी अन् नम्र साधकांनी राष्ट्राची उभारणी करणे !