Menu Close

म्यानमारमधील गृहयुद्धात आतापर्यंत हिंदू आणि बौद्ध यांची ५ सहस्र घरे जाळली !

भारतातील हिंदूंचे रक्षण केले जात नाही, तेथे विदेशातील हिंदूंचे रक्षण कधीतरी होईल का ? -संपादक 

म्यानमार येथील गृहयुद्धात उद्ध्वस्त झालेले घर

यांगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. राखीन राज्यात परिस्थिती सर्वांत गंभीर आहे. येथे म्यानमार सैन्य आणि वांशिक बंडखोर गट यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालू आहे. सैनिकी संघर्षाचे रूपांतर आता धार्मिक तणावात झाले असून त्याचे परिणाम या परिसरात रहाणारे हिंदू आणि बौद्ध धर्मीय यांना भोगावे लागत आहेत. येथील बुथिडांगमध्ये हिंदू आणि बौद्ध यांची आतापर्यंत अनुमाने ५ सहस्र घरे जाळण्यात आली आहेत. येथील बहुतेक लोक आधीच क्षेत्र सोडून सुरक्षित ठिकाणी पळून गेले आहेत. त्यामुळे अनेक घरे रिकामी झाली; मात्र काही लोक आजही येथे रहात आहेत. ही घरे लुटण्यात आली आणि नंतर त्यांच्यासमोर जाळण्यात आली. ११ एप्रिल ते २१ एप्रिल काळात ही घरे जाळण्यात आली. बुथिदांग आता बंडखोर जातीय गट अरकान आर्मीच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे. या आर्मीमध्ये रोहिंग्या मुसलमानांचा समावेश आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News