Menu Close

हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी बनवण्यात आला मल्याळम् चित्रपट ‘पुझू’

  • तमिळनाडूतील माकपचे नेते महंमद शार्शद बनियांदी यांचा दावा !

  • मामूट्टी या प्रसिद्ध अभिनेत्याला संबोधले ‘जिहादी’ !

(ईकोसिस्टम म्हणजे एखादी विचारसरणी पुढे रेटण्यासाठी सर्व स्तरांवर नियोजित पद्धतीने केले जाणारे पद्धतशीर प्रयत्न)

या दाव्यांमध्ये तथ्य असो अथवा नसो; पण भारत आणि हिंदू यांच्या विरोधात संपूर्ण ‘ईकोसिस्टम’च्या रूपाने कशा प्रकारे कार्यरत आहे ?, याचे हे दावे छोटेसे उदाहरण आहे ! -संपादक 

‘पुझू’ चित्रपटाचे भित्तीपत्रक

चेन्नई (तमिळनाडू) – मल्याळम् चित्रपटसृष्टीत गेल्या ५३ वर्षांपासून सक्रीय असलेल्या मामूट्टी या अभिनेत्यावर तो ‘जिहादी’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक आणि माकपचे नेते महंमद शार्शद बनियांदी यांनी यासंदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत. बनियांदी म्हणाले की, मामूट्टी यांची माजी पत्नी रथीना पी.टी. आणि पटकथा लेखक हर्षद यांनी एकत्र येऊन हिंदुविरोधी अन् उच्च जातीच्या विरोधात चित्रपट बनवण्याचा कट रचला होता. यामध्ये मामूट्टी यांनी मुख्य अभिनेते म्हणून काम केले. हिंदूंची अपकीर्ती करण्यासाठी हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी रथिना पी.टी. यांच्यावर दबाव आणण्यात आला होता, असा दावाही बनियांदी यांनी केला आहे.

माकपचे नेते महंमद शार्शद बनियांदी

हे प्रकरण वर्ष २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पुझू’ चित्रपटाशी संबंधित आहे, ज्याची निर्मिती मामूट्टी यांच्या ‘वेफेरर फिल्म्स’ या आस्थापनाने केली होती.

१. या चित्रपटात मामूट्टी यांनी एका ‘उच्च जातीच्या’ आय.पी.एस्. अधिकार्‍याची भूमिका साकारली होती. यात अधिकारी त्याच्या बहिणीचा तिरस्कार करतो; कारण ती तिच्या दलित प्रियकरासह पळून जाते.

२. बनियांदी यांच्या मते, रथिना पी.टी. यांनी मनोरंजन करणारा चित्रपट बनवण्याची योजना आखली होती; परंतु असा दावा केला जातो की, त्यांना कुणा उच्च व्यक्तीचे ऐकावे लागले.

३. बनियांदी यांनी चित्रपटाचे लेखक हर्षद यांचेही वर्णन ‘इस्लामी कट्टरतावादी’ असे केले आहे.

४. विशेष म्हणजे मामूट्टी यांचे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांच्याशी जवळचे संबंध आहेत. वर्ष २००७ मध्ये ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया’च्या अखिल भारतीय परिषदेत मामूट्टी म्हणाले होते की, ही संघटना गुजरातमध्ये सक्रीय असली असती, तर वर्ष २००२ मध्ये दंगल झाली नसती.

मल्याळम् चित्रपटसृष्टीतील मामूट्टी या अभिनेत्यावर तो ‘जिहादी’ असल्याचा आरोप ! सोबत मामूट्टी यांची माजी पत्नी रथीना पी.टी. (चित्रपटाच्या दिग्दर्शिका)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News