Menu Close

उत्तराखंड : अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने त्याचा मित्र नितीनची केली हत्या

यातून अल्पसंख्य असणार्‍यांची खुनशी वृत्तीच दिसून येते. मारेकरी साजिदला आता फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे ! -संपादक 

साजिदला अटक करतांना पोलिस

हरिद्वार (उत्तराखंड) – अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने नितीन नावाच्या त्याच्या हिंदु मित्राची हत्या केली. नितीनचा मृतदेह ४ मे या दिवशी येथील एका पुलाखाली  सापडला होता. हत्येनंतर साजिद पसार होता. १९ मे या दिवशी त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रसारमाध्यमांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

या घटनेविषयी हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक परमेंद्र सिंह डोवाल म्हणाले की,

१. ४ मे या दिवशी पोलिसांना रुडकी येथील सोलानी पुलाखाली एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. हा मृतदेह रुडकी येथील अंबर तलावात रहाणार्‍या नितीनचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चालू केला.

२. विविध सीसीटीव्ही फुटेज तपासून साजिदविषयी आमचा संशय बळावला.

३. साजिदचा भ्रमणभाष सतत बंद लागत होता. त्यामुळे १५ दिवस तो आमच्या हाती लागला नाही. शेवटी १९ मे या दिवशी त्याच्या भ्रमणभाषचे ‘लोकेशन’ मिळाल्याने त्याला अटक करण्यात यश आले.

४. साजिदची पोलीस ठाण्यात कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची स्वीकृती दिली. तो म्हणाला की, काही दिवसांपूर्वी नितीन आणि त्याने मद्यपान केले होते. मद्याच्या धुंदीत नितीनने त्याच्याकडून १३० रुपये हिसकावले होते. यावरून साजिद संतापला होता.

५. ४ मेच्या दिवशी साजिदने नितीनला सोलानी पुलाखाली एकटे पाहून त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर तो पसार झाला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News