Menu Close

वास्तूशास्त्र

Untitled-1

 

सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

सहस्रो वर्षांपूर्वी निसर्ग, वास्तू आणि शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या माध्यमातून साधण्याची कला महान द्रष्ट्यांना अवगत होती. घरातील प्रत्येक वस्तू कशी असावी आणि ती कुठे ठेवावी, याचा बारकाईने विचार करणारे श्रेष्ठ असे हिंदु वास्तूशास्त्रात केले आहे. ‘घरात देवघर कुठे असावे, दागिन्यांचे कपाट कुठे ठेवावे, या आणि अशा अनेक बाबींवर निश्चित मार्गदर्शन करण्यात आले आहे.

भारतीय वास्तूशास्त्राने केलेला विचार अन्य देशांत प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात नाही !

परदेशात प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात वास्तूच्या भक्कमपणावर भर देण्यात आला आहे, तर भारतीय वास्तूशास्त्रात भक्कमपणाबरोबरच त्या घरात रहाणार्‍या व्यक्ती, त्यांची मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तींचे देवाशी असलेले नाते या गोष्टींचाही विचार केलेला आहे. दोन वास्तूशास्त्रांत मूलतः हा फरक असल्याचे सांगून अधिवक्ते वझे म्हणाले, ‘‘आपल्या वास्तूशास्त्राला सूर्यापासून निघणारे किरण, चुंबकीय आकर्षण आणि प्रमुख दिशापोटदिशा या तीन गोष्टींचा आधार आहे.’’

– (दिशाचक्र, पृ. ८३, .पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)

पाश्चात्त्य पद्धतीनुसार उभारलेल्या वास्तू १० वर्षांत कोसळतात आणि भारतातील सहस्रो वर्षांपूर्वीची मंदिरे अद्यापही जशीच्या तशी आहेत !

कुठे सहस्रो वर्षांनंतरदेखील समुद्रात टिकणारा ‘रामसेतू’ बांधणारा स्थापत्यविशारद वानरयंत्रज्ञ नल, तर कुठे बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोसळणारे पूल आणि अन्य इमारती बांधणारे आजचे भ्रष्ट स्थापत्यविशारद !

वास्तूकलेचा इतिहास !

भारतात वास्तूशास्त्र वेदकाळापासून अस्तित्वात असल्याचे अनेक पुरावे मिळतात. गृह्यसूत्रात वास्तूशास्त्राचे अनेक सिद्धान्त आढळतात. शुल्बसूत्रात यज्ञवेदीची रचना करतांना कोणत्या विटा वापराव्यात, हे सांगितले आहे. वाल्मीकि रामायणात नगरे, तट, किल्ले यांची वर्णने जागोजागी आढळतात.

वेदकाळापासूनच वास्तूशास्त्र विकसित झाल्याचा पुरावा म्हणून भारतातील देवालयांकडे पहाता येईल. या देवालयांचा इतिहास अभ्यासपूर्ण तपासला, तर असे आढळून येईल की, या देवालयांच्या निर्मितीमध्ये वेदान्त, योगशास्त्र यांखेरीज भूगोल, भौतिक, गणित, भूमिती आदी शास्त्रांचा, तसेच गुरुत्वाकर्षणादी नियमांचा वापर केलेला आहे. वैज्ञानिक तत्त्वांचा कलापूर्ण वापर करणारी ही देवालये ब्रह्मज्ञानप्राप्तीसह समाजधारणाही करत होती किंबहुना ‘देवालये’ ही त्या काळी समाजजीवनाच्या केंद्रस्थानी होती, असे आढळून येते.

श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी

वेदकाळापासून विकसित झालेले वास्तूशास्त्र आणि विज्ञान यांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘हिंदूंची देवालये’ !

वेदकाळापासूनच वास्तूशास्त्र विकसित झाल्याचा पुरावा म्हणून भारतातील देवालयांकडे पहाता येईल. या देवालयांच्या निर्मितीमध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घातलेली आढळते. देवालयांच्या वास्तूशास्त्राचा अभ्यास करून त्याचे अवतरण समाजात करणे, हेच आजच्या विज्ञानयुगातील वास्तूशास्त्रज्ञांना मोठे आव्हान आहे.

चुंबकशक्तीचा वापर करून मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना करणे !

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील सोमनाथ मंदिरातही चुंबकशक्तीचा वापर करून शिवलिंग अधांतरी ठेवण्यात आले होते, असे म्हणतात. कोणार्क येथील सूर्यमंदिर खूप भव्य होते. या मंदिरात चुंबकशक्तीचा वापर करून सूर्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मंदिरातील चुंबकशक्तीचा सागरातील जहाजांवर परिणाम दिसून येत असे.

प्राचीन शिवदेवालयांचे वैशिष्ट्य !

शिवदेवालयाची रचना नैसर्गिकरीतीने वायूनिबद्ध (एअर कंडिशनिंग) केलेली आढळते. देवालयातील गाभारा खोल भूमीत निर्माण केलेला आढळतो.

. सूर्यकिरणांनुसार रचना : वेदान्त, योगशास्त्र यांखेरीज भौतिकशास्त्राचाही देवालयाच्या वास्तूनिर्मितीत विचार केलेला आढळतो. काही देवालयांमध्ये उत्कृष्ट दिकबंधन (देवालयातील मूर्तीवर एका ठराविक दिवशीच सूर्योदयाची पहिली किरणे पडतील, अशी वास्तूरचना करणे) केलेले दिसते. काही देवालयांसमोर लहान लहान झरोके असे आहेत की, कोणत्याही ऋतूत सूर्याची पहिली किरणे मूर्तीवर पडतात. पुण्याजवळील यवतजवळच्या टेकडीवर असे शिवमंदिर आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या ठिकाणी खोदलेले चक्र हे केवळ सूर्यरथाचे चक्र वा केवळ शिल्प नसून या चाकाच्या आसाची छाया अशी पडते की मास, तिथी आणि वेळ या बिनचूक कळू शकतात.

वेरूळ : वास्तूशास्त्राच्या दृष्टीने वेरूळचे वैâलास लेणे बघितले, तर आपल्या लक्षात येईल की, कशा रीतीने ते उभारले आहे. शिखरापासून खाली एका दगडामध्ये ते कोरत गेलेले आहेत, म्हणजे त्या वास्तूशिल्पींना कोणत्या स्तरापर्यंत त्या वास्तूरचनेचा विचार करावा लागला असेल ? त्यांना मोजमापनाच्या काय पद्धती वापराव्या लागल्या असतील आणि कशा रीतीने त्यांनी ते केले असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही, इतके हे भव्य आहे.

. नादशास्त्रावर आधारलेले देवालयाचे स्तंभ : कन्याकुमारीच्या देवालयात एका बाजूला सप्तस्वरांचे दगडी स्तंभ आहेत, तर दुसर्‍या बाजूला मृदुंगाचे ध्वनी स्तंभात बसवलेले आहेत. दगडाचा नाद विशिष्ट स्वरातच यावा, यासाठी याचा परीघ केवढा घ्यावा लागेल, दगडाला आतून किती पोकळ करावे लागेल, याचे बिनचूक गणित आणि शास्त्र त्यामागे आहे.

. हेमाडपंती देवालये : चिरा एकमेकांमध्ये बसवून केलेला हा वास्तूरचनाकौशल्याचा ठळक प्रकार आहे.

मयसभा

म्हणजे भ्रम उत्पन्न होऊन जल न दिसता ‘भूमी आहे’, असे वाटत असे. ‘अगस्ति संहितेत सोन्याचे पाणी देण्याची विद्या (गोल्ड प्लेटिंग) सांगितलेली आहे.’ महाभारतात याचा उल्लेख आहे.

डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, मासिक भाग्यनिर्णय