कुतुबमिनार नव्हे, तर ध्रुवस्तंभ !

KutubMinarप्राध्यापक एम्.एस्. भटनागर हे वर्ष १९६१ मध्ये काही विद्यार्थ्यांसमवेत कुतुबमिनार बघण्यास गेले होते. तेथे त्यांना सोबतीला एक शासकीय मार्गदर्शक (गाईड) मिळाला. त्याच्याशी झालेल्या प्रश्‍नोत्तरावरून प्रा. भटनागर यांना जी माहिती प्राप्त झाली, त्यावरून कुतुबमिनार या वास्तूविषयी पुढील गोष्टी लक्षात आल्या.

१. कुतुबमिनार ही वास्तू महंमद घोरीने पृथ्वीराज चौहानावर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ बांधली गेली, असे म्हटले जाते. तथापी उभयतांमधील लढाई पानिपत येथे झाली असतांना घोरीने हा स्तंभ देहलीत का उभारला ? या प्रश्‍नाला उत्तर नाही.

२. देहली ही गझनीची राजधानी नव्हती. तो गझनी येथे रहात होता. जर महंमद घोरीने हा स्तंभ उभारला असता, तर त्याचे नाव कुतुबमिनार कशाला ठेवले असते; घोरीमिनारच ठेवले असते ना !

३. हा मिनार घोरीच्या कुतुबुद्दीन ऐेबक नावाच्या गुलामाने बांधला, असे म्हटले जाते; मात्र कुतुबुद्दीन ऐबक हा लाहोर प्रांताचा शासक होता. मग कुतुबमिनार देहली येथे का बांधला ? याला उत्तर नाही.

४. काहींच्या मते कुतुबमिनार हा विजयाचे प्रतिक नसून कुव्वत-उल-इस्लाम या मशिदीचा अजान देण्याचा मिनार होता. कालांतराने ही मशीद हवा आणि पाणी यांनी उद्ध्वस्त झाली; मात्र मिनार कसा टिकून आहे ? यालाही उत्तर नाही.

५. याचाच अर्थ मशीद आणि मिनार एकाच वेळी बांधले गेले नव्हते. मिनार पुष्कळ जुना असावा. मिनारावर अरेबिक भाषेतील कुराणचे आयते जरी कोरले असले, तरी एवढ्या एका कारणाने त्याला मुसलमान वास्तू म्हणणे, म्हणजे एखाद्याची सक्तीने सुंता करून त्याला मुसलमान म्हणण्यासारखे आहे.

ध्रुवस्तंभाची वैशिष्ट्ये !

पुढील ऐतिहासिक सत्याला कुणीही आव्हान द्यावे आणि कुतुबमिनारची निर्मिती मुसलमान राजवटीत झाल्याचेे सिद्ध करून दाखवावे.

१. खरे पाहिले तर, ही वास्तू कुतुबमिनार नसून ध्रुवस्तंभ आहे. ही वास्तू खगोलशास्त्रीय वेधशाळा होती.

२. एखाद्या लहान विमानाने या मिनाराच्या वर जाऊन त्याचे निरीक्षण केले, तर ती २४ पाकळ्या असलेल्या कमळाच्या स्वरूपात दिसते. प्रत्येक पाकळी ही होरा म्हणजे एक घंटा दर्शवते.

३. या मिनारच्या वरपासून खालपर्यंत प्रत्येक मजल्याच्या टोकावरून भूमीवर रेखा काढल्या, तर त्यांची आकृती कमळासारखी होते. वाळवंटात निर्माण झालेल्या इस्लाम पंथात कमळाला कधीही मान्यता नव्हती. सुजलाम् सुफलाम् असलेल्या भारताच्या अतीप्राचीन संस्कृतीतच कमळ आढळते.

(संदर्भ : स्टोन्स स्पीक या ग्रंथातील प्रा. एम्.एस्. भटनागर यांनी लिहिलेल्या लेखावर आधारित)