Menu Close

उपेक्षित क्रांतीकारक राजगुरु

२४ ऑगस्ट : क्रांतीकारक शिवराम राजगुरु जयंती

देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हसत हसत फासावर चढणार्‍या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यापैकी राजगुरू हे महाराष्ट्रातले. २४ ऑगस्ट या दिवशी त्यांच्या असलेल्या जयंतीनिमित्त त्यांच्याविषयी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी ‘धर्मभास्कर’ च्या ऑक्टोबर २००८ अंकात लिहिलेला हा लेख. स्वातंत्र्यानंतर सत्ता उपभोगणार्‍या सत्ताधार्‍यांना क्रांतीकारकाचे मोल काही कळलेच नाही. स्वत:च्या तुंबड्या भरण्यात मग्न असणार्‍या या राजकर्त्यांनी क्रांतीवीरांचीही उपेक्षाच केली यावर डॉ. शेवडे यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे.

१. तुरुंगात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकार्‍यांची नावे न सांगणे 

‘एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीव्र उन्हाळ्यात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकार्‍यांची नावे सांगितली नाहीत.

२. हिंदू व मुसलमान यांच्याबाबत अहिंसेचे वेगवेगळे निकष लावणारे दांभिक गांधीजी ! 

तिघा विरांना फाशीची शिक्षा ठोठावली जाताच देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निषेधपत्रे जाऊ लागली. बाबाराव सावरकर (स्वा. सावरकरांचे बंधू) वैयक्तिक राग-लोभ बाजूला ठेवून वर्धा येथे १५.२.१९३१ या दिवशी गांधींना भेटले. ‘‘गांधी-आयर्विन भेटीत राजबंद्यांच्या सुटकेची मागणी गांधीजींनी करावी आणि राजबंद्यांत अत्याचारी व अनत्याचारी असा भेद केला जाऊ नये’’, असे त्यांनी सांगितले. यावर गांधी म्हणाले, ‘‘समोरचा देईल तेवढेच मागावे.’’ यावर बाबाराव ताडकन म्हणाले, ‘‘तसे असेल, तर स्वराज्याची मागणी निरुपयोगी आहे; कारण इंग्रज ते देणार नाहीत.’’ यावर गांधी म्हणाले, ‘‘अत्याचार्‍यांना सोडा, असे म्हणणे हीनपणाचे आहे. मी अहिंसेच्या ब्रिदाविरुद्ध कसे जाऊ ?’’ ते ऐकताच बाबाराव उत्तरले, ‘‘असे असेल, तर स्वामी श्रद्धानंदांचा खून करणार्‍या अब्दुल रशीदला क्षमा करा, असे आपले म्हणणे हीनपणाचे नव्हते का ? तसाच हीनपणा या राजबंद्यासाठी दाखवा.’’ हे ऐकल्यावर ‘‘आलोच’’, असे म्हणत गांधी उठले व निघून गेले.

३. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सर्वोच्च ध्येयाने आनंदाने मृत्यूला कवटाळणारे क्रांतीकारक !

फाशीपूर्वी एका सहकार्‍याने भगतसिंगांना विचारले, ‘‘सरदारजी, फांसी जा रहे हो । कोई अफसोस तो नही ?’’ यावर गडगडाटी हसून भगतसिंग म्हणाले, ‘‘अरे, या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना ‘इन्किलाब झिंदाबाद’ ही घोषणा सर्वत्र पोहोचावी’, एवढा विचार केला होता. ही घोषणा माझ्या कोट्यवधी देशबांधवांच्या कंठातून निघाली की, तो घोष या साम्राज्यावर घाव घालीत राहील. या छोट्या आयुष्याचे याहून मोठे काय मोल असेल ?’’

राजगुरु म्हणाले, ‘‘बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळ्या शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दुःख वाटते.’’

४. राजगुरूंच्या क्रांतीकार्याविषयी अनभिज्ञ असलेले त्यांच्याच जन्मगावातील लोक !

‘राजगुरूंच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्याजवळील राजगुरुनगर (खेड) या त्यांच्या जन्मगावी जाण्याचा योग आला. संपूर्ण गाव या क्रांतीवीराच्या आदराभिमानापोटी सजले होते. राजकारण साधण्यासाठी राजकीय पक्षांची मोठमोठी होर्डिंग्ज लागली होती. प्रत्येकावर राजगुरूंच्या छायाचित्राखाली राजकीय कार्यकर्त्यांची छबीसुद्धा झळकत होती. ‘राजगुरु अमर रहे ।’ असे लिहिलेले फलक लोकांच्या हातात होते. मी त्यांतील काहीजणांशी संवाद साधला. राजगुरु व त्यांचे क्रांतीकार्य याबद्दल विचारले. दुर्दैवाने कोणालाही नीट माहिती नव्हती. ‘भगतसिंगचे सहकारी’ इथपासून ते ‘सत्याग्रहात भाग घेणारा आंदोलक’, इथपर्यंत काहीही माहिती ठोकून दिली जात होती.

५. चित्रपटातून राजगुरुसारख्या क्रांतीकारकाला चुकीच्या पद्धतीने दाखवूनही गप्प बसणारा अस्मिताहीन मराठी माणूस !

असाच अनुभव महाराष्ट्रात इतरत्र भटकतांनाही येतो. एका ठिकाणी ‘भगतसिंग, सुखदेव व राजगुरु’ या विषयावरचे माझे व्याख्यान झाल्यानंतर चाळिशीचे एक गृहस्थ जवळ येऊन म्हणाले, ‘‘तुमच्या व्याख्यानामुळे ही तीन माणसे होती, हे समजले. मी आजवर हे एकाचेच संपूर्ण नाव असल्याचे समजत होतो.’’ यावर मी काय बोलणार ? तशातच अजय देवगणचा ‘लिजण्ड ऑफ भगतसिंग’ आला. त्यात राजगुरुंना विनोदी दाखवण्यात आले आहे. राजगुरु उतावीळ होते; पण बाष्कळ व बावळट नव्हते. मराठी माणसाचा अवमान केला, तरी तो गप्प रहातो, हे हिंदी चित्रपटसृष्टीला ठाऊक आहे, म्हणूनच अशी हिंमत केली जाते.

६. सशस्त्र क्रांतीकारकांना सापत्न वागणूक देऊन जातीय द्वेषाचे राजकारण करणारे काँग्रेस सरकार !

अ. राजगुरु : २४.८.२००८ रोजी म्हणजे राजगुरूंच्या जन्मशताब्दीच्या दिवशी राजगुरुनगरात मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री यांच्यापैकी कोणीही फिरकले नाहीत. फक्त लोकलाजेस्तव मंत्रीमंडळातील दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थिती लावली. खरेतर जन्मशताब्दीनिमित्त केंद्रसरकारने टपालतिकिट काढायला हवे होते. राजगुरु हे आवश्यक पात्रतेत बसत नसल्याचे त्या कार्यालयाकडून सांगण्यात आले, अशी माहिती तेथील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जाहीरपणे दिली. भगतसिंगचे तिकिट निघू शकते; मात्र राजगुरूंचे नाही. हा अजब न्याय का ? दिल्ली दरबारी महाराष्ट्राचे ४८ खासदार कमी पडतात का ? का ते याबद्दल मौन धरून आहेत ? याचे कारण राजगुरूंची जात हे आहे का ?

आ. विष्णू गणेश पिंगळे : तेथून जवळच असलेल्या तळेगाव ढमढेरे येथील विष्णू गणेश पिंगळे या क्रांतीविराने गदर उत्थानाच्या वेळी फाशीच्या शिक्षेत प्राणापर्र्ण केले. त्यांचीसुद्धा दखल सरकारदरबारी जातीमुळेच घेतली जात नसावी.

बाबू गेनू या तरुणाच्या जन्मशताब्दीसाठी शासनाने कंबर कसली असल्याचे वृत्त आहे. ती डिसेंबरमधे आहे. बाबू गेनू या सत्याग्रहीच्या प्राणर्पणाबद्दल आम्हाला आदर व अभिमान निश्चितच आहे. सशस्त्र क्रांतीकारकांना सापत्न वागणूक मिळू नये ही इच्छा व जातीय द्वेषाचे राजकारण सरकारने राबवू नये, अशी अपेक्षा केली तर काय चुकले ? पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रात एकूण आनंदच आहे !

७. राजगुरूंंच्या वाड्याच्या डागडुजीसाठी मंजूर झालेल्या पैशांतही भ्रष्टाचार करणारे शासन !

शिवराम हरी राजगुरूंचा जन्म ज्या खोलीत झाला ती कौलारू खोली भग्नावस्थेत होती. या जन्मशताब्दीनिमित्त शासनाने तिची डागडुजी करून पुनर्बांधणी केली. एका खोलीच्या बांधकामाचा खर्च तब्बल पावणे सात लक्ष एवढा झाला. ‘पैसा अडवा, पैसा जिरवा’ अशी शासनाची योजना आहे का, कुणास ठाऊक ! राजगुरुवाड्याच्या डागडुजीसाठी दोन कोटी मंजूर झाले आहेत. त्या पैशांना कसे पाय फुटतील, त्याची ही चुणूक आहे.

८. क्रांतीकारक राजगुरूंची महाराष्ट्रात उपेक्षा; पण ‘पंजाबात राजगुरूंची जन्मशताब्दी आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात