लव्ह जिहादच्या संदर्भात प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेले प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे !

अ. हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांचे विवाह यापूर्वीही झाले आहेत; मात्र आताच त्याविषयी इतका कांगावा का करण्यात येत आहे ?

उत्तर :

१. हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांचे विवाह यापूर्वीही झाले असून त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्वच मुलींना मुसलमान व्हावे लागले आहे. दिलीपकुमार (युसूफ खान) यांच्या बहिणीने एका हिंदूशी विवाह केला आणि त्याला मुसलमान करून घेतले. यावरून मुसलमान शिक्षित असले, तरी ते स्वतः धर्मांतरित न होता दुसर्‍याला धर्मांतर करायला लावतात. यावरून लव्ह जिहादचा प्रकार लक्षात येतो.

२. पूर्वी तुरळकपणे घडणार्‍या या घटना आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या कृती आता नियोजनबद्धपणे, संघटितपणे आणि त्याला आवश्यक तो निधी पुरवून एक उपक्रम राबवल्याप्रमाणे करण्यात येत आहेत. केवळ मेरठ (उत्तर प्रदेश) जिल्ह्यामध्ये ४५ दिवसांत ५३ अशी प्रकरणे उघडकीस आली आहेत. यावरून या प्रश्‍नाची दाहकता स्पष्ट होते.

३. भारताशी बंदुकीच्या बळावर जिहाद करता येत नाही, हे धर्मांधांच्या लक्षात आले आहे; म्हणून भारतच नव्हे, तर जगभरातील धर्मांधांनी हे छुपे युद्ध पुकारले आहे.

४. ज्याप्रमाणे मुसलमान आक्रमक त्यांच्यासोबत जनानखाना ठेवत आणि प्रत्येक ठिकाणी हिंदु महिलांची त्यात भर करत, त्याचीच छोटी आवृत्ती म्हणजे लव्ह जिहाद आहे.

आ. लव्ह जिहाद असे म्हणून या प्रकरणाला जातीय रंग देण्यात येत आहे. यामध्ये धर्माचा काही संबंध नाही. ते एक प्रेमप्रकरण असते. त्यातून केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

उत्तर :

१. लव्ह जिहादची प्रकरणे पाहिल्यास प्रत्येक प्रकरणात मुलीवर धर्मांतरित होण्यासाठी दबाव आणल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच हा विषय धर्माशी संबंधित आहे. खरे प्रेम करणारा पुरुष त्या मुलीच्या प्रेमापोटी हिंदु का होत नाही ?

२. या तरुणींना नंतर धर्माच्या कामासाठी म्हणजे जिहादसाठी वापरण्यात येते, मुले प्रसवण्याची यंत्रे बनवले जाते किंवा त्यांना वेश्याव्यवसायाला लावले जाते. या तरुणींचा जिहादसाठी वापर होत असल्याने जिहाद शब्द येणे साहजिक आहे.

३. महाविद्यालयीन हिंदु तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी अनेक मुसलमान तरुणांना वाहने, पैसा आदी पुरवला जातो आणि ते महाविद्यालयांसमोर जाऊन त्या मुलींना फसवतात. हे सर्व एकाच पंथाचे असून मुसलमानेतर मुलींनाच लक्ष्य करतात. यावरून यामध्ये धर्माचा संबंध येतोच येतो.

४. ही फसवणूक असली, तरी तिचा मूळ उद्देश तरुणीचे धर्मांतर करणे, स्वतःचा धर्म वाढवणे, तिचा अपलाभ घेणे, तिच्या जिवाचे बरे-वाईट करणे, असा असतो. त्यामुळे लव्ह जिहादला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत नसून मुळातच तो पंथाधारित कार्यक्रम धर्मांधांकडून राबवण्यात येत आहे.

इ. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष लव्ह जिहादचे राजकारण करत आहेत का ?

उत्तर :

१. हिंदुत्ववादी संघटनांना राजकारण करून कोणताही राजकीय लाभ उठवायचा नाही. त्यांना धर्मरक्षण करायचे आहे. त्यामुळे त्या या प्रकरणात लक्ष घालत आहेत.

२. हिंदुत्ववादी पक्ष यामध्ये लक्ष घालतात; मात्र त्यांना याचे केवळ राजकारण करायचे आहे, असे म्हणणे चूक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे. धर्म टिकला, तर राष्ट्र टिकते. त्यामुळे या संदर्भात हिंदुत्ववादी पक्षांनी बोलणे, हे राष्ट्रांतराला विरोध केल्यासारखेच आहे.

३. आज मराठा पक्ष मराठा आरक्षण मागतो, मुसलमानांचा पक्ष मुसलमानांसाठी आरक्षण मागतो. त्यांना घटनेने ते अधिकार दिलेले आहेत. त्याप्रमाणे हिंदुत्ववादी पक्ष जर हिंदु महिलांच्या सुरक्षेची मागणी करत असेल, तर त्यात चूक ते काय ? जे हिंदुत्ववादी पक्षांना विरोध करतात, त्यांना हिंदु महिला सुरक्षित रहाव्यात, असे वाटत नाही का ?

४. इमाम बुखारी मुसलमानांना धर्माच्या आधारावर मते देण्याचे आवाहन करतात, त्याप्रमाणे हिंदुत्ववादी पक्षांनी कुठेही आवाहन केलेले नाही. ते हे सर्व कर्तव्य म्हणून करत असतील आणि त्याचा त्यांना राजकीय लाभ होणार असेल, तर तो का नाकारावा ? शरद पवारही मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर त्याचा लाभ घेणे चुकीचे नाही, असेच म्हणतात.

५. हिंदुत्ववादी पक्ष हिंदूंच्या अस्तित्वासाठी यामध्ये उतरत असून राजकीय लाभ होणे, हे त्यांच्यासाठी दुय्यम असेल.

र्इ. लव्ह जिहाद हा आतंकवाद आहे का ?

उत्तर : हो, लव्ह जिहाद हा एक धार्मिक आतंकवादच आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे…

१. हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांच्यावर बलात्कार करायचा आणि त्यांचे बळजोरीने धर्मपरिर्तन करायचे, हा आतंकवादच आहे. ही पद्धत सर्व घटनांमध्ये सारखीच असल्याने, हा धार्मिक आतंकवाद आहे.

२. आतंकवादी कृत्य संघटितपणे धर्मांधांच्या टोळ्यांकडून केले जाते. त्याचप्रमाणे धर्मांधांची टोळी एखाद्या हिंदु मुलीला फूस लावण्यासाठी कार्यरत असते. त्यामध्ये मुसलमान तरुणीही हिंदु मुलीला लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवण्यास साहाय्य करतात.

३. आतंकवाद्यांना कुणीतरी पैसा पुरवणारा निराळा असतो, लव्ह जिहादमध्येही तसेच आहे.

४. इस्लामी जिहादी आतंकवाद्यांचा मूळ हेतू विश्‍वाचे इस्लामीकरण करणे असा आहे, तोच हेतू लव्ह जिहादचाही आहे.

समितीचे कार्यकर्ते लव्ह जिहादचा ग्रंथ विक्री करत असतांना एका पोलिसाने विचारलेले प्रश्‍न आणि त्याचा कार्यकर्त्याने केलेला प्रतिवाद !

१. लव्ह जिहाद वगैरे काही नाही, तुम्ही विनाकारण प्रसार करता.

उत्तर : कोईम्बतूर येथे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सभेतील बाँबस्फोट प्रकरणी अटक झालेली मुसलमान महिला ही विवाहापूर्वीची हिंदु तरुणी होती. केरळमध्ये आतंकवाद्यांना कारागृहात चोरून भ्रमणभाषचे सीमकार्ड पुरवण्याच्या आरोपाखाली अटक केलेली तरुणीसुद्धा मुसलमानाशी विवाह करण्यापूर्वी हिंदु होती. अशी विदेशातीलही अनेक उदाहरणे आहेत. यातून हिंदु अन् ख्रिस्ती मुलींचा आतंकवादासाठी वापर होतांना स्पष्ट दिसत आहे. केरळच्या साम्यवादी पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनीही हा उल्लेख २७ जुलै २०१० मध्ये केला होता. त्यावर खळबळही माजली होती.

२. प्रेम करण्याला जात-धर्म कुठे असतो ?

उत्तर : हाच प्रश्‍न तुम्ही मुसलमान मुलगी आणि हिंदु मुलगा प्रेम करत असल्यास त्या मुलीच्या घरच्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. कायद्याने सज्ञान मुलगी स्वतःचे भवितव्य ठरवू शकत असली, तरी केवळ याचा लाभ घेऊन हिंदूंच्या मुलींना फसवून त्यांना आतंकवादी चळवळीत ओढण्याला प्रेम म्हणता येणार नाही. त्यामुळे हे खरे प्रेम नसून प्रेमाच्या नावे टाकलेले जाळे आहे.

३. हे पुस्तक तुम्ही कशासाठी वितरण करता ?

उत्तर : लव्ह जिहाद हे पाककडून अर्थसाहाय्य पुरवून भारतात धर्मांमध्ये तणाव वाढवण्यासाठी असलेले षड्यंत्र आहे, असे आयबीएन् ७ या वृत्तवाहिनीने जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात भारतात जागृती होण्यासाठी कर्तव्य म्हणून हे वितरण करत आहोत.

४. तुम्ही जाती-जातींत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात.

उत्तर : देशाच्या, धर्माच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, हे आमचे एक सूज्ञ नागरिक म्हणून घटनेने सांगितलेलेे कर्तव्य आहे. या आतंकवादाच्या प्रकारांची उदा. बनावट नोटा भारतात पसरवणे, अमली पदार्थांचे युवकांना व्यसन लावणे, तसेच प्रेमाच्या माध्यमातून हिंदु मुलींना धर्मांतर करायला लावणे, यांची माहिती भारतीय जनतेत पोहोचवून जनजागृती करण्याला तेढ निर्माण करणे, कसे म्हणता येईल ?

५. लव्ह जिहाद शब्द वापरण्याला न्यायालयाने बंदी घातली आहे.

उत्तर : तुमच्याकडे त्या न्यायालयाचा आदेश असल्यास दाखवा. लव्ह जिहाद हा शब्द तर केरळच्या उच्च न्यायालयाने वापरला आहे. लव्ह जिहाद शब्द न वापरण्याच्या संदर्भातील याचिका शहेनशाह प्रकरणात केरळच्या उच्च न्यायालयानेच फेटाळून लावली आहे.