Menu Close

‘लव्ह जिहाद’मागील आंतरराष्ट्रीय षडयंत्र

१.  उद्देश

१ अ. जगाचे इस्लामीकरण करणे

१. हिंदू तरुणींचे इस्लामीकरण करून हिंदू वंशवृद्धीचा एक स्रोत नष्ट करणे

२. हिंदू तरुणींशी विवाह केल्यानंतर अनेक अपत्ये जन्माला घालून इस्लामी वंशवृद्धी करणे

३. विवाहानंतर हिंदू तरुणींचा जिहादी कारवाया आणि शस्त्रास्त्र-तस्करी यांसाठी वापर करणे

४. अनेक अपत्ये जन्माला घालून त्यांचा आत्मघातकी पथकांसाठी वापर करणे

वरील उद्देशांमागील अंतिम उद्देश ‘जगाचे इस्लामीकरण करणे’, हाच आहे, हे कोणाच्याही लक्षात येईल.

१ आ. आर्थिक लाभ मिळवणे

१. प्रेमात (‘लव्ह जिहाद’मध्ये) फसलेल्या तरुणींची अश्लील छायाचित्रे प्रसारित करून त्याद्वारे पैसा मिळवणे

२. प्रेमात फसलेल्या तरुणींची अश्लील छायाचित्रे काढून त्यांना प्रतिमाहनन (ब्लॅकमेल) करण्याची धमकी देऊन पैसा उकळणे

३. वेश्यालयात त्यांची विक्री करून त्याद्वारे पैसा कमावणे

४. आखाती (अरब) आणि इस्लामी राष्ट्रांत धर्मांतरित हिंदू तरुणींची विक्री करून भरपूर पैसा कमावणे

१ इ. वासनातृप्ती

प्रेमाचे नाटक करून हिंदू तरुणींशी शारीरिक संबंध ठेवून स्वतःची वासनातृप्ती करणे

१ ई. मुसलमानांनी हिंदू स्त्रियांना पळवण्यामागील स्वा. सावरकरांनी सांगितलेले एक कारण !

‘हिंदूंच्या लक्षावधी स्त्रियांचे मुसलमानांनी अपहरण करण्याचा जो त्या कालखंडातील शतकोशतके धुमाकूळ घातलेला होता, त्याला नुसते धर्मवेड म्हणून हेटाळण्याइतकी किंवा त्यास अनुल्लेखाने दुर्लक्षण्याइतकी ती गोष्ट तुच्छ नव्हती. वस्तूतः मुसलमानांचे ते ‘धर्मवेड’ एक वेड नव्हते, तर एक अटळ सृष्टीक्रमाला अनुसरून (महिलांमधील जननक्षमता जाणून) अंगीकारलेली त्यांची संख्या वाढवण्याची परिणामकारक पद्धत होती.’ – स्वा. सावरकर (१९६३)

२.  ‘लव्ह जिहाद’चे लक्ष्य (टारगेट)

२ अ. हिंदू तरुणी

‘लव्ह जिहाद’चे मुख्य लक्ष्य हिंदू तरुणी हेच आहे. हिंदू तरुणींना आमिषे दाखवून आणि गोड बोलून प्रेमसंंबंध निर्माण केले जातात.

१. ‘हिंदू मुलींना बाटवा, प्रतिदिन २०० रुपये मिळवा !’, अशा आशयाचा ‘फतवा’ ! : ‘संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मुसलमान मौलवींकडून ‘लव्ह जिहाद’साठी ‘प्रतिदिन २०० रुपये घ्या आणि हिंदू मुलींना बाटवा’, असा ‘फतवा’ काढण्यात आला आहे. त्यानुसार हिंदू मुलींना पटवण्यासाठी मुसलमान मुलांना प्रतिदिन २०० रुपये देण्यात येतात. हिंदू मुलीला पटवल्यावर त्यांना एक दुचाकी वाहन आणि तिच्याशी निकाह (लग्न) केल्यावर एक-दोन लाख रुपये दिले जातात.’ – दैनिक तरुण भारत, सोलापूर. (२२.२.२००९)

२. गावातून नगरात (शहरात) आलेल्या हिंदू मुलींच्या मागे लागण्यास प्राधान्य ! : ‘गाव सोडून नगरात आलेल्या मुलींवर मुसलमानांचे
प्राधान्यक्रमाने लक्ष असते. नगरातील राहणीमानाला जुळवून घेण्यासाठी त्यांना उंची कपडे आणि वस्तू यांची आवश्यकता असली, तरी त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा मुलींचा शोध घेऊन त्यांना पैसे दिले जातात, तसेच धुम्रपान, मद्य आदींचे व्यसन लावले जाते. ‘लव्ह जिहाद’ला फसलेल्या अशा मुली मग अन्य हिंदू मुलींना फसवण्यासाठी साहाय्य करतात.’

२ आ. हिंदू विवाहित महिला

अलीकडे हिंदू तरुणींसह विवाहित महिलांनाही प्रेमात फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविषयीचे दोन अनुभव पुढे दिले आहेत.

२ आ १. विवाहित असलेल्या हिंदू स्त्रीचा मुसलमान महिलेच्या माध्यमातून बुद्धीभेद करणे आणि नंतर तिला मुसलमान मुलाने पळवून नेणे : ‘पल्लकड, केरळ येथील प्रेमविवाह केलेल्या एका हिंदू दांपत्याला एक लहान मूल होते. पतीपत्नीचे एकमेकांवर ते महाविद्यालयात असल्यापासून प्रेम होते. विवाहानंतर नोकरीच्या निमित्ताने पत्नीला तिच्या लहान मुलासह दुसर्‍या नगरात स्थलांतरित व्हावे लागले. नव्या ठिकाणी तिच्या शेजारी रहाणार्‍या मुसलमान महिलेने तिला इस्लामची उपासना शिकवली. एक दिवस तिचा पती तिला भेटण्यासाठी तेथे आला, तेव्हा त्याला पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत असल्याचे आढळले. तिचे इस्लाम धर्मीय महिलेत रूपांतर झाले होते. हे पाहून त्याला धक्काच बसला. त्याने पत्नीला पुन्हा घरी नेले आणि महिनाभर तेथेच ठेवले. काही दिवसांत त्यांचा संसार नेहमीप्रमाणे चालू झाला. काही दिवसांनी ती त्या कामावर पुन्हा रुजू झाली, तेव्हा एका मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली आणि पती अन् मूल यांना मागे ठेवून त्यासह पळून गेली.’ – डॉ. मल्लिका आणि श्रीमती संगीता शर्मा, ‘मनःशक्ती समुपदेशन केंद्र’, केरळ

२ आ २. हिंदू तरुणींपेक्षा विवाहित स्त्रियांकडून आर्थिक लाभ अधिक होत असल्याने त्यांना लक्ष्य करणे : ‘महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीचा एक मुसलमान तरुण काही दिवसांपासून प्रतिदिन पाठलाग करत होता. एके दिवशी त्या तरुणाने धीटपणे तिचा हात पकडून बलपूर्वक तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्या स्त्रीने त्याच्या थोबाडीत मारून स्वतःची सुटका करवून घेतली. त्या स्त्रीने कुटुंबियांना घडलेला प्रसंग सांगितल्यावर त्यांनी त्या मुलाला शोधून काढले. या वेळी त्याने सांगितले, ‘‘विवाहित स्त्रियांना प्रेमात ओढणे, हा आमचा नवीन व्यवसाय आहे. आजकाल आम्ही लहान, शालेय अथवा महाविद्यालयीन मुलींना लक्ष्य करणे न्यून (कमी) केले आहे; कारण त्यांच्या पालकांना आमच्याविषयी समजल्यावर एकतर त्यांचे शिक्षण बंद करतात अथवा त्यांचे लग्न लावून देतात. अशा मुलींकडून आमची केवळ शारीरिक भूक भागते; परंतु आर्थिक लाभ होत नाही.

एखाद्या विवाहित स्त्रीला आम्ही पटवू शकलो; तर ती आमच्यासाठी ‘२४ घंटे पैसे पुरवणारे यंत्र’ (ए.टी.एम्. मशीन) किंवा ती आमची स्थायी ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) असते. तिच्याकडून आम्हाला हवे तेव्हा रोख पैसे मिळवता येतात. अशा स्त्रीचा आम्ही ४-५ जण मिळून उपभोग घेतो. आम्ही तिची बहीण, नणंद, मैत्रिणी आदींचीही तिला ओळख करून द्यायला सांगतो. जर तिने आम्हाला विरोध केला, तर आम्ही तिला – तिची अश्लील छायाचित्रे तिच्या नवर्‍याला दाखवण्याची धमकी देतो. तिला तिचा संसार वाचवायचा असल्याने आम्ही जे सांगू किंवा मागू, ते ती द्यायला सिद्ध होते.’’ – एक जागरूक महिला, मुंबई

२ इ. हिंदू तरुण : ‘मुसलमान तरुणीही हिंदू तरुणांना धर्मांतरित करण्यासाठी त्यांच्याशी फसवे प्रेम रचत आहेत. प्रेमात अडकलेल्या तरुणाला विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तरुणी आग्रह धरतात.

२ ई. खिस्ती तरुणी : ‘यांनाही ‘लव्ह जिहाद’साठी लक्ष्य केले जाते. ‘केरळ आर्चबिशप कौन्सील’ने हा प्रकार गंभीरतेने घेऊन ‘तरुणींनी जिहादींच्या प्रेमजाळात न फसण्यासाठी काय करावे’, याविषयी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.’

३.  ‘लव्ह जिहाद’मागील प्रेरणा आणि कट

३ अ. धार्मिक

‘लव्ह जिहाद’मागील कारस्थान मूलतः धार्मिकच आहे. जिहादचा संघर्ष कोणत्याही प्रकारचा अगदी लेखणीचा, वाणीचा, प्रेमाचा किंवा आतंकवादी आक्रमणांचा असू शकतो. जोपर्यंत आपण मुसलमानांच्या धार्मिक शिकवणीचे मूळ लक्षात घेत नाही, तोपर्यंत १,३०० वर्षांपासून तलवार, बंदूक, प्रेम आदी माध्यमांतून चालू असलेली हिंदूंची धर्मांतरे थांबणार नाहीत.

३ अ १. इस्लामची कार्यपद्धत : ‘काफिरांना मुसलमान बनवणे आणि संपूर्ण जग इस्लाममय करणे’, या ध्येयपूर्तीच्या मार्गांमध्ये पवित्र किंवा अपवित्र, असा भेद मुसलमानांसाठी नसतो; कारण इस्लाममध्ये कार्यपद्धत महत्त्वाची नाही, तर अंतिम परिणाम महत्त्वाचा मानतात. सामर्थ्य अल्प असतांना पळून जाणे, समसमान सामथ्र्य असतांना ‘करार’ म्हणजे गोड बोलून रहाणे आणि सत्तासामथ्र्य प्राप्त झाल्यावर बलप्रयोग करणे, अशा इस्लाम विस्ताराच्या तीन अवस्था आहेत. म्हणजेच, ‘लव्ह जिहाद’ हा काही आधुनिक काळातला नवा प्रवाह नाही, तर तो परंपरागत चालत आलेला ‘धर्मांतरा’चा जिहादच आहे. हिंदुस्थानात मुसलमान अल्पसंख्य असल्याने त्यांच्यात सत्तासामथ्र्य नाही; म्हणून येथे प्रेमाचा मार्ग निवडण्यात आला आहे.’

३ अ २. धर्मांध मौलवींची शिकवण : ‘काही मौलवी जिहादी तरुणांना ‘‘हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यापासून मुलांना जन्म दिल्यास तुम्हाला स्वर्ग मिळेल. त्यामुळे इस्लामचा विस्तार होणार असल्याने अल्लाची कृपादृष्टी तुमच्यावर राहील’’, असे सांगून त्यांचा बुद्धीभेद करतात, असे निरीक्षण उत्तरप्रदेशमधील गुप्तचर अधिकार्‍यांनी नोंदवले आहे.’ – ममता त्रिपाठी, स्तंभलेखक

३ आ. आंतरराष्ट्रीय

‘लव्ह जिहाद’ हा हिंदुस्थानातील हिंदू तरुणींना धर्मांतरित करण्याचा शत्रूराष्ट्रांनी रचलेला आंतरराष्ट्रीय कट आहे.

३ आ १. ‘लव्ह जिहाद’साठी अरब राष्ट्रांतून पैशांचा पुरवठा ! : ‘केरळमधील वृत्तपत्रांच्या मते ‘लव्ह जिहाद’साठी अरब राष्ट्रांतून पैसा पाठवला जातो. दमाम (सौदी अरेबिया) येथे असलेली ‘इंडियन फ्रॅटर्निटी फोरम’ ही संस्था याच कारणासाठी पैसा गोळा करते.’

‘लव्ह जिहाद’साठी सौदी अरेबिया येथून ‘वेस्टर्न युनिअन मनी ट्रान्सफर’च्या माध्यमातून हवालाद्वारे पैसा येतो. भारतातील काही दागिन्यांच्या व्यावसायिकांच्या आखाती राष्ट्रांमध्ये शाखा आहेत. त्यांच्याद्वारेही पैशांचे स्थलांतर केले जाते. हज यात्रेसाठी जाणार्‍या यात्रेकरूंच्या माध्यमातूनही पैशांचे स्थलांतर होते; कारण हज येथून येणार्‍या विमानांतील प्रवाशांची कडक पडताळणी होत नाही.’

३ आ २. ‘लव्ह जिहाद’ हे ‘लष्कर-ए-तोयबा’चे हिंदुस्थानच्या विरोधातील छुपे युद्धच ! : ‘पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेने १९९६ पासून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदुस्थानात कार्य करण्यास प्रारंभ केला. ‘लष्कर-ए-तोयबा’कडून ‘लव्ह जिहाद’साठी मुसलमान तरुणांना मोठ्या प्रमाणावर पैसा, अत्याधुनिक साधनसुविधा आणि नियोजनबद्ध आराखडे पुरवले जातात.’