Menu Close

सनातन धर्माचा अवमान केल्‍याविषयी उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करा !

सोजत (राजस्‍थान) येथील हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

उपविभागीय दंडाधिकारी गोपाल जांगीड यांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

सोजत (राजस्‍थान) : सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य करून हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याप्रकरणी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी प्रशासनाला दिले. सोजत येथील उपविभागीय दंडाधिकारी गोपाल जांगीड यांनी हे निवेदन स्‍वीकारले. या वेळी ‘बजरंग दल’ आणि ‘हिंदु जागरण मंच’ यांचे श्री. कैलाश चावला, ‘दुर्गा वाहिनी’च्‍या येथील योगिता सोनी, स्‍थानिक धर्मप्रेमी सर्वश्री प्रकाश जाट अन् महेश वाढवानी, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. अर्चना लढ्ढा, सनातन संस्‍थेचे श्री. दीपक लढ्ढा आदी उपस्‍थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *