Menu Close

पाकिस्तानच्या सिंधमध्ये २ हिंदु बहिणींचे अपहरण : धर्मांतर करून मुसलमानांशी विवाह लावून दिला !

न्यायालयाने दोन्ही मुलींना पालकांकडे सोपवण्याऐवजी सुधारगृहात पाठवले

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अवघ्या १३ आणि १४ वर्षांच्या २ हिंदु बहिणींचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले आणि मुसलमानांशी विवाह लावून देण्यात आला. या लहान मुली न्यायालयाकडे आई-वडिलांसमवेत घरी पाठवण्याची विनवणी करत होत्या; परंतु न्यायालयाने त्यांना कुटुंबासमवेत पाठवण्यास नकार दिला. न्यायालयाने त्यांना घरी पाठवण्याऐवजी सुधारगृहामध्ये पाठवले. पाकिस्तानी न्यायालयाकडून मुलींना सेफ हाऊसमध्ये पाठवणे हा एका ठराविक पद्धतीचा भाग मानला जातो. या सुधारगृहामध्ये मुली आणि त्यांचे  नातेवाइक यांना इतके धमकावले जाते की, शेवटी त्यांना विवाह स्वीकारणे भाग पडते.

पत्रकार आणि अल्पसंख्यांक हक्कांच्या कार्यकर्त्यांनुसार कच्छी कोळी समाजातील या मुलींची नावे सीता आणि रूपी अशी आहेत. या दोघांचा अनुक्रमे अमजद सोलांगी आणि मन्सूर सोलांगी यांच्याशी विवाह लावून देण्यात आला.

१० दिवसांत ६ हिंदु मुलींचे धर्मांतर

टंडो अल्लाहयार जिल्ह्यामध्ये हिंदु अल्पवयीन मुलींच्या अपहरणाविषयीची चिंता वाढली असतांनाच ही नवी घटना समोर आली आहे. ९ सप्टेंबरला जिल्ह्यातून १४ वर्षांच्या पानसी कोहली या आणखी एका हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली. या जिल्ह्यात अवघ्या १० दिवसांच्या आत ६ हिंदु अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

या घटना पूर्वीही घडत होत्या आणि पुढेही घडत रहाणार आहेत; कारण त्या रोखण्याचे साहस न भारताकडे आहे ना जगभरातील हिंदूंकडे !

संदर्भ : सनातन प्रभात 

Latest News