Menu Close

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या महासचिवपदी निवड झाल्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना ग्रंथ भेट देतांना डावीकडून दुसरे श्री. विनीत पाटील आणि श्री. पराग गोखले

पुणे – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्येच्या महासचिवपदी निवड झाल्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘धर्मश्री’ या त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ अन् ‘धर्मशिक्षण फलक’ हे समितीचे ३ ग्रंथ आणि भेटवस्तू देऊन प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा भावपूर्ण सन्मान करण्यात आला अन् त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यात आले.

समितीच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण केला असता, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी तो स्वीकारून भाविकांप्रती स्नेह व्यक्त केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा संघटक श्री. पराग गोखले आणि श्री. विनीत पाटील उपस्थित होते. अयोध्येतील भव्य श्रीराममंदिराशी संबंधित महत्त्वपूर्ण दायित्व मिळाल्याविषयी प्रतिनिधींनी पूज्य स्वामीजींप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Latest News