
मुंबई – अभिनेत्री क्रिती सानोन हिने अश्लील कपडे परिधान करून केलेल्या रक्षाबंधनाच्या विज्ञापनावर सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ‘जीवा’ आस्थापनाने हे विज्ञापन हटवले आहे.
GIVA removes its Raksha Bandhan ad featuring actress Kriti Sanon.
GIVA — “We have the highest regard and deep respect for Indian culture, traditions and festivals. As a brand, we have always believed in celebrating these joyous moments with the entire family and this time we… pic.twitter.com/eTWv4Ax0uR
— ANI (@ANI) August 26, 2026
‘आम्हाला भारतीय संस्कृती आणि सण-उत्सव यांच्याप्रती नितांत आदर आहे. या विज्ञापनामुळे समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आमचा तसा हेतू नव्हता. आदर म्हणून आम्ही ते विज्ञापन सर्व माध्यमांमधून मागे घेतले आहे. या सणासुदीच्या काळात तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !’, असे आस्थापनाने इन्स्टाग्रामवरून स्पष्ट केले. आदर व्यक्त करत हे विज्ञापन सर्व माध्यमांतून मागे घेतल्याचेही आस्थापनाने स्पष्ट केले.
GIVA ज्वेलरीच्या जाहिरातीत अभिनेत्री क्रिती सेननकडून रक्षाबंधनाच्या परंपरेचा अवमान

GIVA ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन विशेष जाहिरातीवरून सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननने रक्षाबंधनासारख्या पवित्र सणालाही एक ‘फॅशन कॅम्पेन’ बनवून टाकले आहे.
जाहिरातीमध्ये क्रिती सेनन आधुनिक आणि बोल्ड पोशाखात रक्षाबंधन साजरी करताना दिसत आहे. परंतु, आक्षेप फक्त तिच्या कपड्यांवरच नाहीये. जाहिरातीत ती तिच्या भावाच्या आधी आपल्या पाळीव कुत्र्यालाही राखी बांधताना दिसत आहे.
Stop mocking Hindu festivals for commercial gains! The Raksha Bandhan ad featuring @kritisanon completely trivializes our sacred traditions.
Our festivals are rooted in deep values, not corporate fashion statements. Stop disrespecting our heritage under the guise of modernity! pic.twitter.com/RAK5cvGAdK— 🚩Mohan Gowda🇮🇳 (@Mohan_HJS) August 24, 2026
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याशी आणि त्या नात्यातील भावनिक परंपरेशी जोडलेला सण आहे. अशा परिस्थितीत भावासोबत कुत्र्यालाही राखी बांधून या परंपरेच्या मूळ भावनेला कमकुवत केले जात आहे.
तसेच अशा पवित्र सणांच्या वेळी अभिनेत्रीने तोकडे कपडे परिधान केले आहेत, तसेच कपाळावर टिकलीही लावलेली नाही. अशा प्रकारे अर्धनग्न कपडे घालणे हे आमच्या सण-संस्कृतीचा अपमानच आहे.
बॉलिवूड आणि मोठे ब्रँड्स दरवेळी केवळ हिंदू सण आणि परंपरांसोबतच असे प्रयोग करण्याचे धाडस करतात. ते इतर कोणत्याही धर्माच्या प्रमुख सणाला आणि धार्मिक परंपरांना अशाच प्रकारे बदलून किंवा नवीन स्वरूपात सादर करण्याचे धाडस करतील का?
हिंदू जनजागृती समिती सर्व हिंदूंना आवाहन करते की, या जाहिरातीचा निषेध करून ती हटवण्याची मागणी करावी. तसेच कंपनी आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांना हिंदूंची जाहीर माफी मागण्यास भाग पाडावे.







