हिंदु जनजागृती समितीची पणजी पोलीस ठाण्यात तक्रार

पणजी – मांडवीतील ‘बिग डॅडी’ कॅसिनोवर भगवा ध्वज फडकवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी कॅसिनो व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, असे तक्रारस्वरूप निवेदन हिंदु जनजागृती समितीने पणजी पोलीस ठाण्यात दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हिंदु समाजाची धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या परंपरेतील भगवा ध्वज हा एक श्रद्धेचा विषय आहे. भगवा ध्वज पवित्र मानला जातो. हा भगवा ध्वज जुगार चालत असलेल्या कॅसिनोसारख्या ठिकाणी वापरल्यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’चे कलम २९९ नुसार धार्मिक भावना दुखावणे दंडनीय अपराध आहे. हेतूपुरस्सर आणि द्वेषपूर्ण हेतूने ध्वजाचा वापर केल्यास हा गुन्हा अधिकच गंभीर बनत आहे. या प्रकरणी कॅसिनोच्या व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी.







