Menu Close

मुंबईत ‘सेल्फी स्टिक’वरील श्री गणेशमूर्तीद्वारे श्री गणेशाचे विडंबन !

मुंबई – मुलुंड येथील ‘मुलुंडचा मोरया गणेशोत्सव मंडळा’च्या गणेशमूर्तीचा व्हिडिओ नुकताच प्रसारित झाला आहे. त्यात श्री गणेशमूर्ती ‘सेल्फी स्टिक’वर उभी आहे. थोडक्यात श्री गणेश भ्रमणभाषमध्ये स्वतःचेच छायाचित्र काढत आहे, असा त्याचा आशय आहे. हे चालचित्र पाहून अनेकांनी ‘हे आपल्या लाडक्या गणरायाचे विडंबन आहे’, अशी तीव्र खंत व्यक्त केली आहे. (हिंदूंनो, केवळ खंत व्यक्त करून थांबू नका, तर असे विडंबन करणार्‍या मंडळांना भेट देऊन आदर्श श्री गणेशमूर्ती कशी असावी, याचे प्रबोधन करा ! – संपादक)

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत . –  संपादक) 

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यानेच त्यांच्याकडून असे विडंबन केले जाते. हिंदूच देवतांचे विडंबन करत असल्याने अन्य धर्मीय याचा अपलाभ घेतात. हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?
  • श्री गणेशाला उभ्या स्वरूपात दाखवणे म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला तिष्ठत ठेवण्यासारखेच आहे !

Latest News