
राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मिता आणि गौरवाचे प्रतीक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज फडकवले जातात. मात्र, अनेक वेळा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज समारंभानंतर रस्त्यांवर, कचरापेट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विखुरलेले आढळतात.
विशेषतः शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून वापरण्यात आलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज कार्यक्रमानंतर अयोग्य पद्धतीने फेकून दिल्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान रोखण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाप्रती आदराची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ हे अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा आणि गरिमा कायम राखण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी समितीच्या वतीने विविध ठिकाणी संबंधित प्रशासन आणि संस्थांना निवेदने देण्यात येत आहेत.
हे देखील वाचा : राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची शपथ घ्या
१. दापोली

२. सिंधुदुर्ग

३. कोल्हापूर










