Menu Close

लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन, महिला अत्याचार यांसाठी कठोर कायदा करा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीत हिंदू महिला सुरक्षित नाहीत. प्रत्येक वर्षी १० सहस्रपेक्षा अधिक लव्ह जिहादच्या घटना नोंद होतात. पोलीस ठाण्यात घटनांची नोंद न होणारी अनेक प्रकरणे असून अनेक महिला-मुली यांना नंतर हत्यांनाही सामोरे जावे लागते. तरी लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन, महिला अत्याचार यांसाठी कठोर कायदा करा, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३१ ऑक्टोबaर या दिवशी निदर्शने करण्यात आली. या वेळी सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. अशोक रामचंदानी, अखिल भारतीय हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. जयवंत निर्मळ यांसह अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *