-
१ घंटा खोलीत डांबून मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न
-
मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा नोंद

बिदर (कर्नाटक) – १५ ऑगस्टला ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देणार्या हिंदु विद्यार्थ्याला धमकावल्याची घटना जिल्ह्यातील चिटगुप्पा शहरात असलेल्या शाहीन महाविद्यालयात घडल्याचे नुकतेच समोर आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थी सागर गौळी याने या घोषणा दिल्या होत्या. यावरून शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल हकीम यांनी सागरला धमकावले आणि पुन्हा अशी चूक करता कामा नये, अशी ताकीद दिली. तसेच त्याला १ घंटा शाळेतील एका खोलीत डांबून त्याच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्नही केला.
Shame on Principal Abdul Hakeem!
After Independence Day, this Shaheen PU College head in Bidar stopped students from chanting “Vande Mataram” and “Bharat Mata Ki Jai”, calling these sacred slogans “belonging to a particular religious community” and banning them on campus.
This… pic.twitter.com/HqUqYo67jY
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) August 21, 2026
(म्हणे) ‘पुन्हा वन्दे मातरम् ची घोषणा दिल्यास खबरदार !’ – अब्दुल हकीम
शाहीन शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल हकीम यांच्यावर विद्यार्थ्याच्या पालकांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हकीम यांनी सागरला ‘ही (वन्दे मातरम्) एका विशिष्ट धार्मिक समुदायाची घोषणा आहे आणि अशा प्रकारच्या घोषणा आमच्या महाविद्यालयात चालणार नाहीत. पुन्हा अशी घोषणा देऊ नकोस’, अशी धमकी दिली होती. पालकांनी पुढे सांगितले की, महाविद्यालयात हिंदू आणि मुसलमान विद्यार्थी एकत्र शिक्षण घेतात. तथापि मुख्याध्यापक हकीम धर्माच्या आधारावर त्यांच्यात केवळ शत्रुत्वच निर्माण करत नाहीत, तर भेदभावही करत आहेत.
जनतेत संतापाची लाट !
या प्रकरणात पीडित मुलाचे वडील हिरोबा गौळी यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापक हकीम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटना उघडकीस येताच हिंदुत्वनिष्ठांनी हकीम यांना धारेवर धरले. शाळेचे मुख्याध्यापक म्हणून राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत, तसेच देशाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशा घटना काँग्रेसची सत्ता असलेले कर्नाटक पाकिस्तानी राजवट बनण्याच्या दिशेने जात असल्याच्याच दर्शक होत ! आता या प्रकरणात या मुसलमान मुख्याध्यापकाला अभय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक, हिंदु जनजागृती समिती
अशा घटना थांबवायच्या असतील, तर मुख्याध्यापकाला जन्मठेप देऊन शाळेला टाळे ठोकले पाहिजेत ! – संपादक, हिंदु जनजागृती समिती







