Menu Close

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) : राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, तसेच क्रांतीकारकांचे योगदान या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन

डावीकडून श्री.एम्. एच्. चौगुले, श्री. एम्.एम्. पोतदार, श्री. डोईजड सर, श्री. किरण दुसे, सौ. काव्या दुसे, श्री. एस्.जी. जाधव आणि श्री. प्रमोद जगताप

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथील ‘आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज’ या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा, तसेच क्रांतीकारकांचे योगदान या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी नुकतेच मार्गदर्शन केले. यात भारताचा गौरवशाली इतिहास, आताच्या युवकांसमोरील आव्हाने, युवा पिढी कशा प्रकारे खोट्या कथानकांच्या आहारी जात आहे आणि वर्ष २०४७ मध्ये विकसित भारत निमाण करण्यात युवकांची भूमिका, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी करावयाचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे

या मार्गदर्शनाच्या वेळी ८०० विद्यार्थी उपस्थित होते. याच विषयावर दुपारच्या सत्रात मिनचे येथील ‘आदर्श विद्यानिकेतन’ या ठिकाणी झालेल्या व्याख्यानासाठी माध्यमिक विद्यालयाचे ४०० विद्यार्थी उपस्थित होते.

Latest News