Menu Close

मुंबईत गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत अंडी फेकणारा दानिश शेर खान याला अटक !

(म्हणे) ‘फटाक्यांचा धुराचा त्रास झाल्याच्या रागापोटी कृत्य केले !’

मुंबई – माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत एका इमारतीवरून अंडी फेकण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ३६ घंट्यांत आरोपी दानिश शेर खान (वय २२ वर्षे) याला अटक केली आहे.

आरोपी दानिश हा ऑनलाईन मागणी घेऊन परिसरामध्ये अंडी घरपोच देण्याचा व्यवसाय करतो. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे तो अंडी पोचवत होता. तेथील इमारतीत प्रवेश करतांना मिरवणुकीत वाजवलेल्या फटाक्यांच्या धुरामुळे त्याला त्रास झाला. त्याचा राग मनात धरून दानिशने हे कृत्य केले. त्याच्यावर भायखळा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाचा त्रास हिंदू मुकाटपणे सहन करतात आणि फटाक्यांचा धुराचा त्रास झाल्याचे कारण देत हिंदुद्वेषाआडून धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मिरवणुकांवर अंडी फेकतात, हे लक्षात घ्या ! धर्मांधांची असहिष्णुता जाणा ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोरून वाजतगाजत गेल्यावर त्यांच्यावर मुसलमान आक्रमण करतात, याचा अर्थ भारत हिंदूंचा नसून तो मुसलमानांचा आहे, असे आता समजायचे का ? अशांना आता त्यांना वर्ष १९४७ मध्ये दिलेल्या पाकिस्तानात जाण्यास सांगण्याची वेळ आली आहे, असेच स्पष्ट होते ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

धुराचे कारण ही धूळफेक असून हिंदूंना धर्मांध मुसलमानांच्या मोठ्या कटाचा विचार करून सतर्क रहाणे आवश्यक आहे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती


२४ ऑगस्ट

मुंबईत माझगाव येथे श्री गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी फेकली अंडी !

मूर्तीवर नेम धरून अंडी फेकण्यात आली !

मुंबई – ‘माझगावचा मोरया’ या सार्वजनिक उत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीवर २३ ऑगस्टाच्या रात्री मुसलमानांनी अंडी फेकली. संतापजनक प्रकार म्हणजे पहिल्यांदा एक अंडे फेकल्यावर हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले. त्यानंतर पुन्हा २ अंडी श्री गणेशमूर्तीच्या दिशेने फेकण्यात आली. मिरवणुकीवर फेकण्यात आलेली अंडी मूर्तीवर नेम धरून मारण्यात आली होती; मात्र मूर्तीवरील छतामुळे अंडे मूर्तीवर पडले नाही, तर दुसरे अंडे मूर्ती असलेल्या ‘ट्रॉली’च्या पुढे पडले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा संतापजनक प्रकार घडूनही पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक केली नाही. घटना समजताच रात्री १२ वाजता मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते भायखळा पोलीस ठाण्यापाशी एकवटून कारवाईची मागणी करू लागले. त्यानंतर रात्री उशिरा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदवला. 

२३ ऑगस्टच्या रात्री ८.३० ते ९ या वेळेत मिरवणुकीवर एक अंडे फेकण्यात आले. त्यानंतर अर्धा घंट्याने पुन्हा २ अंडी फेकण्यात आली. मिरवणूक नारळवाडी येथील ‘कॉन्टिनेंटल हाईट्स’ या टॉवरच्या येथे आली असता ‘सी’ विंग इमारतीच्या एका मजल्यावरून मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आली. या इमारतीत मुसलमानच रहात असल्याची माहिती समोर आली आहे. मिरवणुकीवर फेकण्यात आलेली अंडी मूर्तीचा नेम धरून मारण्यात आली होती; मात्र मूर्तीवरील छतामुळे अंडे मूर्तीवर पडले नाही, तर दुसरे अंडे मूर्ती असलेल्या ‘ट्रॉली’च्या पुढे पडले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

इमारतीमध्ये चौकशी करायला पोलीस गेलेच नाहीत !

हा प्रकार घडल्यानंतर सर्व हिंदूंनी त्या इमारतीमधील कुटुंबांना खाली बोलावून ‘अंडी कुणी फेकली ?’ याविषयी चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली; परंतु पोलीस इमारतीमध्ये शिरलेच नाहीत. पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे संतप्त हिंदू भायखळा पोलीस ठाण्यावर धडकले आणि कारवाईची मागणी केली.

यानंतर गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना संपर्क केला. त्यांनी हस्तक्षेप केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

ज्या इमारतीमधून धर्मांध मुसलमानांनी अंडी फेकली, ती इमारत बुलडोझरद्वारे पाडण्याची मागणी हिंदूंनी केली पाहिजे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

अशा घटनेत मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असत्या, तर एव्हाना मुंबई पोलिसांनी हिंदूंचे अटकसत्रच चालवले असते. आता अतीसहिष्णू हिंदूंच्या धार्मिक भावनांचा प्रश्‍न असल्याने आणि मुंबई पोलिसांनी मुसलमानांसमोर शेपूट घातल्याने हिंदूंच्या अथक प्रयत्नानंतर अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती

Latest News