Menu Close

सोलापूर : विद्यार्थ्यांसाठी हिंदू जनजागृती समितीकडून स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

संकटांना सामोरे जाण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – सौ. मोनिका कोठे

नानचाकूची प्रात्यक्षिके सादर करतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रशिक्षक

सोलापूर – स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास, शिस्त आणि धैर्य निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्वसंरक्षणाचे कौशल्यही आत्मसात करावे, असे मत सौ. मोनिका कोठे यांनी ‘स्व. तात्यासाहेब विष्णुपंत कोठे’ यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त ‘विष्णुपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल’ येथे ४ दिवसीय शिबिरामध्ये व्यक्त केले. सौ. मोनिका कोठे या स्थानिक भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्नी आहेत. शिबिराच्या पहिल्या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके घेण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षकांचा सत्कार करतांना उजवीकडून (दोन नंबर) सौ. मोनिका कोठे आणि अन्य मान्यवर

प्रशिक्षक श्री. यश मुगड्याल, श्री. लिंगराज हुळ्ळे, कु. श्रुतिका पोगुल, कु. गौतमी सीता आणि कु. रुचिता आडम यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे, लाठी-काठी आणि नानचाकूची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी डॉ. राधिकाताई चिलका, भाजपचे नगरसेवक श्री. सत्यनारायण गुर्रम, श्री. रमेश यन्नम, श्री. निर्मलकुमार काकडे, प्राचार्या सौ. पुष्पा नायर आदी उपस्थित होते.

Latest News