Menu Close

नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ करण्यासाठी हिंदु संघटनांची गृहमंत्र्यांकडे मागणी

काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर हिंदु संघटना आक्रमक

काठमांडू (नेपाळ) – नेपाळला पुन्हा एकदा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचा प्रारंभ पहाडी क्षेत्रातून झाला होता; परंतु आता याचे पडसाद भारताच्या सीमेला लागून असलेल्या मधेश आणि तराई भागांतही ऐकू येत आहेत. अलीकडेच मधेश भागात झालेल्या हिंदु-मुसलमान दंगलींनंतर ही मागणी अधिक तीव्र झाली आहे. या महिन्याच्या प्रारंभी नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग आणि एक हिंदु संघटना यांमधील भेटीनंतर यावर चर्चा रंगली आहे. हे पहाता भारतामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार सीमेवर पाळत वाढवण्यात आली आहे.

नेपाळी गृहमंत्री आणि हिंदु संघटना यांची बैठक

नेपाळचे गृहमंत्री सुदन गुरुंग

दंगलीच्या घटनेनंतर गृहमंत्री सुदन गुरुंग यांनी बाधित भागांचा दौरा करून स्थानिक नागरिक आणि पीडित यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांची ‘हिंदु सम्राट सेना’ नावाच्या संघटनेसमवेत झालेली भेट चर्चेत आली. नेपाळी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार गृहमंत्री आणि हिंदु संघटना यांच्यात १३ सूत्रांच्या प्रस्तावावर चर्चा झाली, ज्यामध्ये नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र बनवण्यावर चर्चा करण्याचा प्रस्तावही समाविष्ट होता.

या चर्चेत ‘हिंदु राष्ट्र’ विषयाचा समावेश करण्यावरून प्रश्नही उपस्थित केले गेले की, गृहमंत्र्यांकडे अशा सूत्रांवर चर्चा करण्याचा अधिकार होता का ? तथापि नंतर चर्चेत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांनी कोणत्याही औपचारिक करारावर पोचल्याचा दावा फेटाळून लावला. एका अधिकार्‍याने ‘कांतीपूर’ या नेपाळी वृत्तवाहिनीला सांगितले की, ही बैठक कोणत्याही करारासाठी नव्हती, तर संघटनेला सरकारसमोर मागणी मांडण्याची एक संधी होती.

गुरुंग यांना दिलेल्या निवेदनात ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी

यानंतर २ ऑगस्टच्या सकाळी गृहमंत्री सुदन गुरुंग यांना दिलेल्या निवेदनाची प्रत समोर आली, ज्यामध्ये हिंदु राष्ट्राच्या मागणीवर चर्चेचा स्पष्ट उल्लेख होता. हे निवेदन ‘संयुक्त हिंदु मोर्चा’च्या नावाने देण्यात आले होते. यामध्ये नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र म्हणून बहाल करण्यावर चर्चा करण्यासाठी ३ महिन्यांच्या आत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या प्रक्रियेसाठी एक स्पष्ट समयमर्यादा निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

नेपालमधील हिंदु संघटना एकत्र

ही मागणी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा नेपाळ सरकार तणाव रोखण्यासाठी संबंधित गटांशी संवाद साधत आहे; मात्र सरकारच्या प्रयत्नांनंतरही विरोध सातत्याने वाढत आहे. संयुक्त हिंदु मोर्चा, हिंदु सम्राट सेना, राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष आणि हिंदु युवा संघ यांसारख्या नेपाळमधील १५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् राजकीय पक्ष एकाच मंचावर एकत्र आले आहेत. या सर्व संघटना आणि पक्ष बैठका अन् जनसंपर्क यांच्या माध्यमांतून एक सामायिक रणनीती आखून या आंदोलनाला पुढे नेत आहेत. या संघटनांचे म्हणणे आहे की, हे सूत्र आता एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण नेपाळचा विषय बनला आहे.

काय घडले होते ?

भारताच्या सीमेलगत असलेल्या नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज येथे २६ जुलै या दिवशी कावड यात्रेच्या वेळी मुसलमानांनी ‘डीजे’ला (मोठ्या संगीत यंत्रणेला) विरोध केल्यानंतर हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार अन्य प्रांतांही पसरला. पोलिसांनी तो नियंत्रित करण्यासाठी गोळीबार केला. त्यात ३ हिंदूंचा मृत्यू झाला होता. यानंतर हिंसाचार अधिक वाढला आणि हिंदूंनी मुसलमानांना पलायन करण्यास भाग पाडले. यानंतर या भागात सैन्याला तैनात करण्यात आले. या वेळी काही मशिदींवर आक्रमण झाल्याची वृत्तेही सामाजिक माध्यमांत झळकली होती.

हिंदूंमधील रोषाचे कारण !

गेल्या काही वर्षांपासून नेपाळमध्ये मुसलमानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आधी हे मधेश आणि तराई या भारताच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये पहायला मिळत होते. आता हे पहाडी, म्हणजे मध्य आणि उत्तर नेपाळच्या भागातही पहायला मिळत आहे. मुसलमान हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचे आरोपही होत आहेत. त्यामुळे नेपाळी हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. याचे व्हिडिओही समोर येत आहेत.


नेपाळमध्ये ‘हिंदु राष्ट्रा’सह अन्य मागण्यांसाठी विनय यादव यांचे १० दिवसांपासून चालू आहे उपोषण

उपोषणाला बसलेले विनय यादव

काठमांडू (नेपाळ) – येथील मैतीघर मंडला भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते विनय यादव गेल्या १० दिवसांपासून उपोषण करत आहेत. ‘जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही’, असा त्यांचा दावा आहे. सुनसरीच्या देवानगंज येथे मुसलमानांनी कावड यात्रेकरूंवर केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित हिंदूंना न्याय मिळवून देणे आणि सरकारसमवेत झालेला करार लागू करणे या त्यांच्या मागण्या आहेत. यासह नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे, मुसलमानांसाठीचे आरक्षण समाप्त करणे, मुसलमान आयोग विसर्जित करणे, घुसखोरीवर कारवाई करणे आणि हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कडक कारवाई करणे यांसारख्या अनेक मागण्यांचा यात समावेश आहे.

सरकारसमवेत झालेल्या करारात दंगलीत मृत झालेल्या ३ हिंदूंना ‘हुतात्मा’ दर्जा देणे, कुटुंबांना १० लाख नेपाळी रुपयांचे साहाय्य, कुटुंबातील एका सदस्याला रोजगार, घायाळांवर विनामूल्य उपचार आणि निष्पक्ष चौकशी करणे, अशी आश्‍वासने देण्यात आली होती. यादव आता प्रश्‍न उपस्थित करत आहेत की, या आश्‍वासनांची पूर्तता कुठपर्यंत झाली ?

कोण आहेत विनय यादव ?

विनय यादव हे नेपाळचे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते ‘राष्ट्रीय एकता दल’चे अध्यक्ष असून ‘राष्ट्रीय एकता अभियान’ या नागरी मंचाचे मुख्य संयोजक आणि नेते आहेत. त्यांचे राजकीय आणि सामाजिक अभियान रस्त्यांपासून संसदेपर्यंत विविध सूत्रे मांडण्यावर केंद्रित राहिले आहे.

विनय यादव यांनी केलेली आंदोलने

१. पोखरा विमानतळावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आंदोलन

२. खासदारांना मिळणारा संसदीय विकास निधी रोखण्याची मागणी करत आंदोलन

३. चीनने नेपाळच्या भूमीवर केलेल्या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवला. यासाठी काठमांडू येथील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयापर्यंत निदर्शने केली. या आंदोलनानंतर सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली.

४. चीनचा ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प नेपाळच्या हिताविरुद्ध सांगत तो रहित करण्याच्या मागणीसाठी काठमांडूमध्ये मोठे आंदोलन

५. चीनकडून अनावश्यक शस्त्रे खरेदी करण्याची प्रक्रिया रहित करण्याची मागणी

६. नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याच्या मागणीसाठीच्या नागरी आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग

७. मधेश प्रदेश सरकारने आणलेल्या मदरसा विधेयकालाही केला होता विरोध

८. दूरचित्रवाहिनीवरील ख्रिस्ती मिशनर्‍यांशी संबंधित कार्यक्रमाला केला होता विरोध

Read more on Nepal Hindu Rashtra

Latest News