Menu Close

मी स्वत: शाडूची मूर्ती बसवतो आणि त्यासाठी आपण लोकांचे प्रबोधन करू : मुख्याधिकारी अभिजित हराळे

नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

जत (जिल्हा सांगली) : मी स्वत: शाडूची श्री गणेशमूर्ती बसवतो, तसेच शाडूच्या श्री गणेशमूर्ती उपलब्ध होत असल्यास आपण लोकांचे प्रबोधन करू, असे आश्‍वासन जत येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी दिले. कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी हे आश्‍वासन त्यांनी दिले. जत येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सचिन पाटील यांनी या संदर्भात जे शक्य होईल ते सर्व सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली. जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, उपनगराध्यक्ष अप्पासो पवार यांसह विविध नगरसेवक यांनाही निवेदन देण्यात आले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *