Menu Close

अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथील शांतता बैठकीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

शांतता बैठकीत विषय मांडतांना श्री. रवींद्र अंबिलवादे

अंबड : अंबड (जिल्हा संभाजीनगर) येथे पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर आणि सुग्रिव साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शांतता बैठक पार पडली.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रवींद्र अंबिलवादे यांनी आदर्श गणेशोत्सव कसा असावा याविषयी माहिती देऊन गणेशोत्सवात जुगार खेळणे, डीजे वाजवणे हे कसे अयोग्य आहे, हे सांगितले. तसेच अशा गोष्टी न करण्याविषयी आवाहन|केले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक यांनी गणेशोत्सवाच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले.

या बैठकीस अंबड तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *