Menu Close

मूर्तीदानासाठी बळजोरी करणार नाही ! – मुख्याधिकारी, गडहिंग्लज

मुख्याधिकारी नागेंद्र मतळेकर (डावीकडे) यांना निवेदन देतांना समितीच्या कार्यकर्त्या

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) :  श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्‍वासन मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले. कृत्रिम तलाव आणि गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत, या मागणीसाठी ३० ऑगस्ट या दिवशी गडहिंग्लज येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी हे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यानंतर हेच निवेदन नगराध्यक्षा सौ. स्वाती कोरी आणि प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार श्री. क्षीरसागर यांनाही देण्यात आले.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *