Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या लेगिंग्ज अमेरिकेतील आस्थापनाने मागे घेतल्या

हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !

मुंबई : कपड्यांची ऑनलाइॅन विक्री करणार्‍या अमेरिकेतील प्रेमा डिजाईन्स या आस्थापनाने लेगिंग्जवर (महिलांचे विशिष्ट प्रकारचे पायजामे) हिंदूंच्या देवता श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापली होती. असे कपडे वापरून झाल्यावर कोठेही टाकले जातात. यामुळे देवतांचा अनादर होत असल्याने हिंदु जनजागृती समितीने या आस्थापनाकडे पत्र पाठवून ते त्वरित मागे घेण्याची मागणी केली होती. हिंदूंना यासंदर्भात वैध मार्गाने निषेध करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. अनेक हिंदुत्ववाद्यांनी ईमेल, टि्वटर यावरून मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याच्या परिणामस्वरूप प्रेमा डिजाईन्सने देवतांची चित्रे असलेले लेगिंग्ज मागे घेतल्या आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *