Menu Close

‘युपाकॅप इक्विपमेंट’ आस्थापनाकडून श्री गणेशाचा अवमान !

उत्पादनांना प्रसिद्धीसाठी श्री गणेशाला गाडी धुतांना दाखवले !

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

मुंबई – ऑटोमोबाईल गॅरेज आणि गाड्यांचे ‘सर्व्हिसिंग’ यांसाठी लागणारी यंत्रसामग्री बनवणार्‍या आणि त्या यंत्रांची पुरवठादारांना विक्री करणार्‍या ‘युपाकॅप इक्विपमेंट’ या आस्थापनाने श्री गणेशाची विटंबना केली आहे. स्वत:च्या उत्पादनांच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या व्हिडिओमध्ये या आस्थापनाने श्री गणेशाला गाडी धुतांना दाखवले आहे. ‘फेसबुक’, ‘यू ट्यूब’ आदी सामाजिक माध्यमांवरून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये श्री गणेश आणि समवेत उंदिर यांना कार्टूनच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये आस्थापनाची वेगवेगळी यंत्रे श्री गणेश पहात असल्याचे दाखवण्यात आले आहे. याच व्हिडिओमध्ये पुढे प्रेशर पंप हातामध्ये घेऊन श्री गणेश चारचाकी गाडी धुवत आहे, असे दाखवण्यात आले आहे. या आस्थापनाचे मुख्यालय बिहार राज्यातील पाटणा येथे असून प्रत्येक राज्यात या आस्थापनांचे पुरवठादार आहेत.

संपादकीय भूमिका

  • व्यावसायिक लाभासाठी श्री गणेशाला गाडी धुतांना दाखवणे, हे श्री गणेशाचे विडंबन आहे. जोपर्यंत हा विडंबनात्मक व्हिडिओ मागे घेऊन हिंदूंची सार्वजनिकरित्या क्षमा मागत नाही, तोपर्यंत ‘युपाकॅप इक्विपमेंट’ या आस्थापनाच्या यंत्रांवर बहिष्कार घालावा, असे हिंदूंना वाटले तर चूक ते काय ?
  • हिंदू सहिष्णु असल्यामुळेच हिंदूंच्या श्रद्धेचे मूल्य नाही, असेच म्हणायचे का ?

संदर्भ : सनातन प्रभात 

Latest News