Menu Close

श्री गणेशमूर्तीला मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या रूपात दाखवून अश्‍लाघ्य विडंबन केले !

  • सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍याचे हिंदुद्वेषी कृत्य

  • ‘भारत हिंदु मुन्नानी’चा तीव्र विरोध आणि धरणे आंदोलन

  • पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई नाही !

मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या रूपात बनवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या रूपात बनवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

चेन्नई (तमिळनाडू) – गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या रूपात श्री गणेशमूर्ती बनवण्यात आली आहे. हे कृत्य सत्ताधारी ‘टी.व्ही.के.’ (तमिलगा वेत्री कळघम् – तमिळनाडू विजय महासंघ) पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केल्याचे समोर आले. याला ‘भारत हिंदु मुन्नानी’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने तीव्र विरोध केला असून येथील ‘एच्-६’ पोलीस ठाण्यासमोर संघटनेचे उपाध्यक्ष आर्.टी.आय. सेल्वम् यांनी श्री गणेशचतुर्थीच्या सकाळी धरणे आंदोलन केले. या वेळी त्यांच्या हातात तक्रारीची प्रत, तसेच एक श्री गणेशमूर्ती होती. या आंदोलनानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. वादग्रस्त मूर्ती जप्त करून ती एका खासगी शाळेच्या परिसरात सुरक्षित ठेवल्याचा पोलीस सूत्रांनी दावा केला आहे.

१. चेन्नईतील कोरुकुपेट येथील करुमरीअम्मन नगर भागात टी.व्ही.के. पक्षाचे पदाधिकारी राजेश आणि इतर सहकारी यांनी श्री गणरायाला मुख्यमंत्र्यांच्या वेशात दाखवून गणेशाचे विडंबन केल्याचे सेल्वम यांना लक्षात आले होते. यावरून त्यांनी ६ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

२. तक्रार करूनही ११ सप्टेंबरला पोलिसांच्या अनुमतीविना या वादग्रस्त गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. या विरुद्ध १४ सप्टेंबरला सेल्वम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यासमोरच धरणे आंदोलन करण्यात आले.

प्रमुख मागण्या

१. देवांच्या मूर्तींचे अभिनेते किंवा राजकीय नेते यांच्या रूपात विडंबन करण्यास पूर्णपणे बंदी घालावी.

२. ‘टी.व्ही.के.’च्या संबंधित पदाधिकार्‍यांवर तात्काळ कायदेशीर गुन्हे नोंद करावेत.

३. भविष्यात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या घटना घडता कामा नयेत, याचे प्रशासनाने दायित्व घ्यावे.

संदर्भ : सनातन प्रभात 

Latest News