सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्याकडून सायबर पोलिसांकडे तक्रार

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाशी जोडलेली एक अल्पवयीन मुलगी आणि तिचे वडील संजय आझाद यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. या मुलीच्या एक्स खात्यावरून केलेल्या पोस्टमध्ये भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण, श्री सरस्वतीदेवी आणि श्री दुर्गादेवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह संदर्भ असल्याचा आरोप या तक्रारीतून करण्यात आला आहे.
१. अधिवक्त्या सचदेवा यांनी म्हटले की, मी धर्माचरण करणारी हिंदु महिला आहे. मी ‘एक्स’वर काही पोस्ट पाहिल्या. या पोस्ट सार्वजनिकरित्या उपलब्ध असून त्यांनी माझ्या आणि इतर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हेतुपुरस्सर आणि द्वेषयुक्त उद्देशांनी या पोस्ट प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
२. अधिवक्त्या सचदेवा यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ आणि १९६ यांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील लागू कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. आरोपींनी सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२६ या काळात केलेल्या ४ पोस्ट्सद्वारे हिंदु देवतांचा आणि धार्मिक विश्वासांचा अपमान केल्याचा आरोप आहे.
हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविरोधात सातत्याने कायदेशीर कृती करण्यासाठी पुढाकार घेणार्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांचा आदर्श सर्वत्रच्या अधिवक्त्यांनी आणि हिंदूंनी घ्यायला हवा ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







