तक्रारीनंतर दुकानमालक जयंत याला अटक

तिरुनेलवेली (तमिळनाडू) – येथे एका बिर्याणी दुकानासमोर लावलेल्या विज्ञापनाच्या कापडी फलकावर श्री गणेश बिर्याणी शिजवत असल्याचे दाखवण्यात आले होते. याला तीव्र विरोध झाला.
SHOCKING! A Biryani shop in Tirunelveli displayed a banner showing LORD GANESHA cooking CHICKEN BIRYANI for a Vinayagar Chaturthi offer, sparking protests over hurt religious sentiments. Police REMOVED the banner, and shop owner Jayant ARRESTED. https://t.co/j0DzA1xDSv
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) September 15, 2026
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक)
या विज्ञापनात ‘अरेबिक स्टाईल ६५ बिर्याणी – रु.९९’ असे लिहिण्यात आले होते. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार प्रविष्ट करण्यात आली. यानंतर पोलिसांनी ३० वर्षीय दुकानमालक जयंत याला अटक केली. सेल्वराज यांनी ही तक्रार प्रविष्ट केली. आता हा फलक कुणी बनवून घेतला आणि कधी लावला, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
- हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत, हेच यातून लक्षात येते ! अशांना अधिकाधिक कठोर शिक्षा झाली पाहिजे, तरच अन्यांना वचक बसेल !
- हिंदूंना धर्मशिक्षण नसले, तरीही देवतांविषयी कसा भाव असावा, इतके ज्ञानतरी असणे अपेक्षित आहे. तेही नसेल, तर अशांना हिंदु तरी का म्हणावे ?
संदर्भ : सनातन प्रभात







