Menu Close

(म्हणे) सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! : डॉ. हमीद दाभोलकर

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांचा थयथयाट !

dr_hamid_dabholkar

पुणे : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यास उशीर झाला; पण आता आरोपपत्र प्रविष्ट होणे, हे तपासाला योग्य दिशेने नेणारे पाऊल म्हणता येईल. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने त्यांची भूमिका आतातरी स्पष्ट करावी’, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली. (‘गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे !’, असे स्वत: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले असतांना हमीद दभोलकर यांनी असे म्हणणे ही त्यांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्याविषयी अद्यापही भूमिका स्पष्ट केलेली नाही, असे ते म्हणाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *