Menu Close

काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – डॉ. सुजित यादव

नालासोपारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ८० हून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग !

nallasopara_rha

नालासोपारा : केंद्रात आणि राज्यात हिंदुत्ववाद्यांची सत्ता असूनही हिंदूंवरील अत्याचार थांबलेले नाहीत. आम्हालाही विकास हवा आहे; मात्र हिंदूंच्या भावनांचा मान राखूनच तो व्हायला हवा. काश्मिरी पंडितांचा काश्मीरमध्ये परतण्याचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे. काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी डॉ. सुजित यादव यांनी केले. १८ जून या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात शिवसेना, भाजप, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू गोवंश रक्षा समिती, ब्राह्मण महासंघ, बजरंग सेवा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे ८० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांना खोट्या आरोपाखाली अटक – दीपक तिवारी, धर्माभिमानी

भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली कारस्थान रचून त्यांना अटक करण्यात आली.

या आंदोलनात बजरंग सेवा दलाचे श्री. सूर्यभान सिंग, आपचे श्री. बळवंत कुलकर्णी, ब्राह्मण सेवा संघाचे श्री. गोपाळ पांडे, धर्माभिमानी सर्वश्री प्रदीप दुबे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिप्तेश पाटील यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *