
जुन्नर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा सूचीत स्थान मिळाले आहे. धर्मांधांनी या गडाच्या पायथ्याशी हजरत शहीद अब्दुल हमीद (र.अ.) उपाख्य पीर पहाडीवाले बाबा दरगाह शरीफ (कुसूर-जुन्नर) या नावाने काही महिन्यांपासून दरगाह उभारला आहे.
Shivneri गड परिसरातील कथित अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर Kirit Somaiya यांच्याकडून 7 दिवसांचा अल्टिमेटम #PuneNews #ShivneriFort #ndtvmarathi https://t.co/zKpbntb5cJ
— NDTV Marathi (@NDTVMarathi) September 8, 2026
जागतिक वारसा स्थळ परिसरात गडापासून १०० मीटर राखीव क्षेत्रात कोणतीही इमारत किंवा बांधकाम करता येत नाही. हे बांधकाम चालू असतांना पुरातत्त्व विभाग, वन विभाग, तहसीलदार आणि पोलीस प्रशासन या सर्वांनी बघ्याची भूमिका घेतल्याविषयी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या दर्ग्याच्या विरोधात प्रशासनाने ३ दिवसांत कारवाई केली नाही, तर सर्व शिवभक्त येथे येऊन ठिय्या आंदोलन करतील, अशी चेतावणी किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यांनी नुकतीच जुन्नर येथे जाऊन या परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली. त्यात गडाच्या संरक्षित परिसराच्या अगदी लगत हे नवीन बांधकाम आहे.
अशी मागणी का करावी लागते? प्रशासन स्वतः का कारवाई करत नाही? सर्व किल्ल्यांवर होणाऱ्या अशा बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने बुलडोझर कारवाई करावी! – संपादक, हिंदू जनजागृती समिती







