
कोल्हापूर – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ‘महापौर जनता दरबारा’त महापौरांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक्तीने आक्षेप घेतला होता. या व्यक्तीला कोल्हापूर महापालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी सडेतोड आणि आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. त्याविषयी विशेष अभिनंदन करत हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने महापौरांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनात लावण्यासाठी ‘श्रीरामा’ची भव्य प्रतिमा दिली. या प्रसंगी महापौरांचे पती श्री. संग्रामसिंह निकम हेही उपस्थित होते.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे साधक श्री. शिवानंद स्वामी, श्री. महेंद्र अहिरे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख श्री. योगेश केरकर, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास जाधव, महिला आघाडीच्या शीला माने, ‘हिंदु जागरण’च्या डॉ. अश्विनी माळकर उपस्थित होत्या. या प्रसंगी सर्वांनी ‘जय श्रीराम’च्या जोरदार घोषणा दिल्या.’







