Menu Close

धर्मांधांकडून ईद च्या दिवशी अनेक ठिकाणी उपद्रवाच्या घटना !

  • बेंगळुरूमध्ये ईदच्या मिरवणुकीत मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा पुनीत केरेहळ्ळी’ च्या घोषणा !

  • ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

  • एका हिंदुत्वनिष्ठावर लोखंडी सळीद्वारे आक्रमण

आंदोलन करतांना पुनीत केरेहळ्ळी आणि कार्यकर्ते

बेंगळुरू (कर्नाटक) – बसवनगुडी येथील एन्.आर्. मार्गावर हिंदुत्वनिष्ठ नेते पुनीत केरेहळ्ळी यांच्या ‘राष्ट्र रक्षणा पडे’ (राष्ट्र रक्षण दल) या  संघटनेचे कार्यालय असून तिथे पुनीत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ईदच्या मिरवणुकीसाठी आलेल्या एका मुसलमानांच्या गटाने केरेहळ्ळी यांच्या कार्यालयसमोर येताच ‘सर तन से जुदा पुनीत केरेहळ्ळी’ अशी घोषणबाजी चालू केली. त्या वेळी कार्यालयातून बाहेर आलेले पुनीत केरेहळ्ळी, कार्यकर्ते मुरळी आणि इतर जण यांनी मुसलमान देत असलेल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’, ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) या घोषणांना प्रत्युत्तर म्हणून ‘जय श्रीराम’ अशी घोषणा दिली. या वेळी दोन्ही गटांत वाद झाला, तसेच एका मुसलमानाने लोखंडी सळीने मुरळी यांच्या डोक्यावर वार केल्याने ते घायाळ झाले, असा आरोप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच पुनीत केरेहळ्ळी यांच्या कार्यालयावर जाणीवपूर्वक आक्रमण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी बसवणगुडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारींवरून ३ गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी एकूण ८ जणांना कह्यात घेऊन चौकशी चालू केली आहे. पुनीत केरेहळ्ळी यांच्या समर्थकांविरोधात मुसलमान नेते अब्दुल रझाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

धार्मिक सलोखा बिघडवल्याचा आणि गटांमध्ये वैमनस्य निर्माण केल्याचा आरोप करत पुनीत केरेहळ्ळी, गोपी गौडा, पुनीत गौडा, विनोद नटराज आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कमल पाशा, अबूबाकर सिद्दीक आणि सैयद अनास या ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करून चौकशी केली जात असून ३ अल्पवयीन मुलांनाही कह्यात  घेण्यात आले आहे.

१. या आक्रमणाचा निषेध करत पुनीत केरेहळ्ळी आणि त्यांचे समर्थक रस्त्याच्या मध्यभागी आंदोलनाला बसले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुनीत यांच्यासह अनेकांना कह्यात घेतले.

२. ‘मुसलमानांचे आक्रमण झाल्यानंतर केवळ २ पोलीस आले. हिंदूंच्या  गणेशोत्सवाच्या वेळी २०० ते ३०० पोलीस तैनात करतात; पण पुनीत केरेहळ्ळी यांचे कार्यालय याच मार्गावर असतांना त्यांना सुरक्षा देण्यासाठी एकही पोलीस तिथे नव्हता’, असा आरोप ‘राष्ट्ररक्षण सेने’च्या एका कार्यकत्यानेकेला.

३. ‘पुनीत केरेहळ्ळी यांना पोलीस वाहनातून नेत असतांना मुसलमानांचा जमाव वाहनाच्या मागे धावत जात आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होता’, असाही  आरोप करण्यात आला.

४. या प्रकरणाविषयी माध्यमांशी बोलतांना पोलीस उपायुक्त वंशीकृष्ण म्हणाले की, हा वाद नेमका का झाला ? हे तपासण्यासाठी घटनास्थळा समोरील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण कह्यात घेतले जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठाच्या नावाने थेट हत्येच्या घोषणा दिल्या जाण्यापर्यंत धर्मांध मुसलमानांचे धाडस होते, हे काँग्रेस शासित कर्नाटकातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच द्योतक आहे ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 


भांडुपमध्ये ईदनिमित्त लावली क्रूरकर्मा टिपू सुलतानची चित्रे !

मुंबई – भांडुपमधील जमीलनगर येथे ईदनिमित्त रस्त्यावर मुसलमानांनी हिरव्या रंगाच्या पताका लावल्या आहेत. या पताकांसमवेत सहस्रावधी हिंदूंचे शिरकाण करणार्‍या, तलवारीच्या जो बळारावर वर हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानाची चित्रेही लावण्यात आली आहेत.

परिसरात लावलेली टिपू सुलतानची चित्र

जमीलनगर भागात ठिकठिकाणी अशा प्रकारे  टिपू सुलतानाची चित्रे लावलेली आहेत.

हिंदूंचे शिरकाण आणि धर्मांतर करणार्‍या क्रूरकर्म्याच्या उदात्तीकरणातून मुसलमानांची जिहादी वृत्ती दिसून येते !  – संपादक, हिंदू जनजागृती समिती 


अंधेरी (मुंबई) : ईदच्या मिरवणुकीत ‘मस्जिद वही बनाएंगे’च्या घोषणा !

  •  पोलिसांनी हनुमंताचे मंदिर कापडाने झाकले !

  • ‘पॅलेस्टाईन’चे झेंडेही फडकावले !

मुंबई – अंधेरी (पश्चिम) येथे २६ ऑगस्ट या दिवशी ‘ईद-ए-मिलाद’निमित्त मुसलमानांनी काढलेल्या मिरवणुकीच्या वेळी रस्त्याच्या कडेला असलेले हनुमान मंदिर पोलिसांकडून कापड बांधून पूर्णपणे झाकण्यात आले.

अंबोली पोलीस ठाण्याच्या कक्षेत हा भाग येतो. मिरवणूक संपल्यावर मंदिरावरील कापड काढण्यात आले. या मिरवणुकीमध्ये ‘मस्जिद वही बनाएंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच भारताच्या नकाशाच्या मध्यभागी मशीद असल्याची चित्रे झळकवण्यात आली. मिरवणुकीमध्ये ‘पॅलेस्टाईन’चे झेंडेही फडकवण्यात आले. पोलिसांची कचखाऊ भूमिका धर्मांधांचा उद्दामपणा यांविषयी हिंदूंमध्ये संतापाची भावना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार हारून खान यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढण्यात आली होती.

धर्मभावना दुखावल्याप्रकरणी हिंदूंनी संघटित होऊन याविषयी या पोलिसांच्या वरिष्ठांकडे विचारणा करायला हवी, अन्यथा मुंबईतील घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक, हिंदू जनजागृती समिती 

Read more on Anti Hindus

Latest News