Menu Close

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद आणि भंडारा यांना प्रशासकीय जाचातून मुक्त ठेवा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

  • ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाला निवेदन  

  • महाप्रसाद आणि अन्नदानाविषयी ‘एफ्.डी.ए.’ची भूमिका पक्षपाती आणि संशयास्पद !

रत्नागिरी – केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदान यांचाच विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी आणि कारवाई करण्याची चेतावणी देणे, ही एफ्.डी.ए. प्रशासनाची भूमिका अत्यंत पक्षपाती आणि संशयास्पद आहे. अन्नसुरक्षेचे नियम जर आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजेत. केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदान  यावर अन्नसुरक्षेच्या नावाखाली होणार्‍या एकतर्फी कारवाईविषयी हिंदु समाज आणि भक्त यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण होत असल्याच्या भावना निवेदनाद्वारे शासनाकडे व्यक्त करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांना देण्यात आले. हे निवेदन जिल्ह्यात खेड, मंडणगड, रत्नागिरी आणि राजापूर येथे देण्यात आले असून महासंघाच्या वतीने योग्य कारवाई करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.

१. खेड

खेड : तहसीलदार सुधीर सोनवणे यांना निवेदन देतांना मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ

येथील तहसीलदार सुधीर सोनवणे यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी निवेदन देतांना मंदिर विश्वस्त बीजघर येथील निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, श्री. सुनील भोसले, श्री भगवान जंगम, समर्थनगर येथील साई मंदिरचे श्री. समीर पाटणे, नांदगाव येथील श्री. अनंत दळवी, खारी येथील श्री. विनोद बहुतुले, धर्मप्रेमी श्री. प्रवीण लाड, श्री सिद्धेश देवळेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड   अन् महासंघाचे जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

२. रत्नागिरी

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देतांना मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देतांना सर्वश्री गोविंद भारद्वाज, श्रीराममंदिराचे सुनील नलावडे, नित्यानंद दळवी, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कुवारबावचे श्री. मंगेश राऊत, श्री काशीविश्वेश्वर देवस्थानाचे श्री देवेंद्र झापडेकर, श्री दत्त मंदिर खालची आळीचे संतोष देशपांडे-वडगावकर, श्री देव म्हसोबा श्री दत्त मंदिर जुवेचे श्री. सुधीर चव्हाण, नाचणे येथील श्री नवलाई देवस्थानाचे श्री. राजेंद्र सावंत, श्री साई सेवा मित्र मंडळाचे श्री. संतोष सावंत श्री हनुमान मंदिर कुवारबावचे श्री. नीलेश लाड, श्री चंडिकादेवी मंदिर गणपतीपुळेचे श्री राज देवरुखकर श्री हनुमान मंदिर मजगाव रोड रत्नागिरीचे श्री. किशोर भुते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिकांत घाणेकर आणि श्री. विष्णु बगाडे उपस्थित होते.

३. राजापूर

महसूल नायब तहसीलदार श्रीमती सायली गुरव यांना निवेदन देतांना मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ

येथे विविध मंदिरांच्या विश्वतांकडून निवेदन देण्यात आले. हे निवेदन महसूल नायब तहसीलदार श्रीमती सायली गुरव यांनी स्वीकारले. या वेळी राजापूर येथील श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिराचे अध्यक्ष संदीप मालपेकर, श्री कामादेवी देवस्थान ट्रस्टचे  देवेंद्र शेट्य, समितीचे विनोद गादीकर, तसेच भक्त अभय मेळेकर, प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

४. दापोली

तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे-घोलप यांना निवेदन देताना

येथील तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे-घोलप यांना निवेदन देण्यात आले . या वेळी जालगाव येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष रमेश कडू, उपाध्यक्ष श्री. सर्वश्री सुरेश रेवाळे, सुरेश भांबिड, वसंत वाडकर, श्री देव गणपति मंदिरचे सतीश जोशी, प्रसाद फाटक यांसह हिंदुत्वनिष्ठ सुनंदन भावे, राकेश गुरव, श्री चंडिका मंदिर लाडघरचे सुधीर साळवी, समितीचे परेश गुजराथी, चंद्रकांत उजाळ आणि शरद पवार  उपस्थित होते.

Read more on Mandir Mahasangh

Latest News