-
मुसलमानांनी भडकवलेल्या दंगलीत पोलिसांकडून हिंदूंना अटक केल्याचे प्रकरण
-
गुन्हेगारांना पकडून कडक कारवाई केली जाईल! – उपमुख्यमंत्री विजय शर्मा

रायपूर (छत्तीसगड) – राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री. विजय शर्मा यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि हिंदूंना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे सांगितले. यावर शर्मा यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन देत सांगितले की, या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. राज्य सरकार या घटनेत सामील असलेल्या वास्तविक गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई करेल. हिंदू जनजागृती समितीचे छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या आश्वासनाची माहिती दिली.
🚩 बिलासपुर दंगा प्रकरण में हिंदू समाज की आवाज बुलंद!
खपरगंज और मसानगंज में हुए हिंसक पथराव एवं हमले के प्रकरण में हिंदुत्वनिष्ठ नेताओं के प्रतिनिधिमंडल ने उपमुख्यमंत्री एवं गृहमंत्री श्री @vijaysharmacg से मुलाकात कर ज्ञापन सौंपा। प्रतिनिधिमंडल ने निर्दोष हिंदू युवाओं की तत्काल… pic.twitter.com/7ws6nhr1e1
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) August 31, 2026
“काय आहे प्रकरण?
खपरगंज भागात हिंदूंना लक्ष्य करून नियोजित हल्ला करण्यात आला. न्यायाची मागणी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या निष्पाप हिंदू तरुणांना बंदी बनवण्यात आले.
शिष्टमंडळात सामील असलेले हिंदू नेते: श्री. कमल विश्वास, अधिवक्ता आशिष शर्मा, सुदीप सनातनी आणि इतर.
हिंदुत्वनिष्ठांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत
१. ज्या घरांतून नियोजित दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, त्यांची ओळख पटवून त्यांच्या अवैध संपत्तीवर तातडीने ‘बुलडोझर’ कारवाई करण्यात यावी.
२. खोट्या प्रकरणात बंदी बनवलेल्या (अटक केलेल्या) निष्पाप हिंदू तरुणांची कोणतीही दिरंगाई न करता सस्मान मुक्तता करण्यात यावी.”







